ॅविहिरींनी गाठला तळ
By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:50+5:302016-03-12T00:29:53+5:30
दिंडोरी : कमी पर्जन्यमानाचा परिणाम, शेकडो कुपनलिका आटल्या, शेतीवर सावट, जनावरांना पाणी नाही
दिंडोरी : कमी पर्जन्यमानाचा परिणाम, शेकडो कुपनलिका आटल्या, शेतीवर सावट, जनावरांना पाणी नाही
दिंडोरी (भगवान गायकवाड)- तालुक्यात गेल्या काही वर्षापासून जमिनीची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत, तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणे
निम्म्यावर राहत कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व
पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कुपनलिका आटल्या असून
विहिरींनी तळ गाठला आहे .
कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांचे
लगतचे गावांना यंदा नुसत्या टंचाई च्या झळा पोहचत नाही तर यंदा टँकर
मागविण्याची वेळ आली असून टँकर मुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकर
मागणीची वेळ येणार आहे . तर तब्बल ११३ गावे यंदा पाणी टंचाई च्या फेर्यात
आले असून त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे . इतर तालुक्यांची
तहान भागविणार्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ
आली आहे . दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून गावोगावी शेकडो कुपनलिका हातपंप आहे . मात्र यंदा प्रथमच विविध कुपनलिकांचे पाणी आटले असून हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारी तच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे . पंचायत समतिी तर्फे ऑक्टोबर ते
डिसेंबर ,जानेवारी ते मार्च व िएप्रल ते जून तिमाही पाणीटंचाई
निवारणासाठी कृती आराखडा बनविला असून त्यात मार्च पर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जून पर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा
अंदाज बांधला आहे , प्रार्थिमक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवू
लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहे . विहिरींचे खोलीकरण ,खाजगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरु करण्यात आली आहे . विविध गावातील नादुरु स्त पाणीपुरवठा योजना दुरु स्तीचे काम हाती घेण्यात आले आहे . विविध गावात कुपनलिका खोदण्यात येत आहे मात्र अनेक कुपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे .टंचाई आराखड्यानुसार पिहल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्या त आल्या दुसर्या टप्प्यात 65 गावे 8 पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसर्या टप्प्यात 33 गावे व एक पाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे असे यंदा तब्बल एकूण 103 गावे 10 वाडी पाडे यांना टंचाई च्या झळा पोहचल्या असून यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे . उर्विरत गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे .
कादवा सह इतर नदीवर अवलंबून असणार्या अनेक गावांना पाणीटंचाई
दिंडोरी तालुक्यात सात धरणे असून कादवा ,उनंदा,कोलवण या प्रमुख नद्यांवर
विविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने या
नद्यांना पाणी सोडले न गेल्याने सार्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहे
त्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत आहे . त्यात
प्रामुख्याने चिंचखेड,कुनार्ेली,खडक सुकेणे ,लोखंडे वाडी
जोपूळ,मातेरेवाडी,पाडे,हातनोरे या गावांना मोठा फटका बसला असून यातील
काही गावांना प्रशासनाने वेळप्रसंगी टँकर देण्याची वेळ येण्याची भीती
व्यक्त केली आहे . खडक सुकेणे कुनार्ेली म्हंजे,रड्तोंडी,तळेगाव
वणी,कोशिंबे,चौसाळे,पिंगळ वाडी,िअहवंत वाडी टिटवे
गणेशगाव,वरवंडी,नाळेगाव,चिंचखेड ,माळेगाव काझी चीकाडी या गावांना
टँकर लागण्याची शक्यता आहे तर टँकर मुक्त झालेल्या तळेगाव दिंडोरी येथे
तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून विहिरीवर पाण्यासाठी महिलांची मोठी
गर्दी होत आहे तळेगाव सह ढकांबे या गावांना टँकर ने पाणीपुरवठा करण्याची
वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे . वाघाड कालव्याला पाणी न आल्यास या
परिसरात मोठ्या पाणीटंचाई ला सामोरे जावे लागणार आहे .
----------------------
दिंडोरी शहरात पाणीटंचाई
दिंडोरी शहरासाठी सद्या वाघाड धरणातून आवर्तन सोडून ते साठवण बंधार्यात
टाकत पाणीपुरवठा केला जातो मात्र यंदा पाणीटंचाई अधिक असल्याने व धरणात कमी पाणी साठा असल्याने वेळेवर आवर्तन सुटले जात नाही त्यामुळे दहा बारा दिवस पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे
फेबृवार्पर्यंत विविध हातपंप खाजगी कुपनलिका यांना पाणी होते परंतु मार्च
च्या पिहल्याच आठवड्यात बहुतांशी हातपंप कुपनलिका कोरड्या झाल्यने भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे . दिंडोरी शहरात सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून एक आवर्तन मिहनाभर पुरत नसल्याने नगरपंचायतीचे नियोजन कोलमडत दरिमहन्याला आठ दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प होत आहे .दिंडोरी शहरात खाजगी टँकर फिल्टर पाणी पुरवठा करणार्या जार कंपनीची मोठी उलाढाल सुरु आहे.
-----------------
भीषण दुष्काळ
दिंडोरी तालुक्यातील यंदाचा दुष्काळ हा भयावह असल्याचे जेष्ठ
नागरिक सांगत असून पिण्याच्या पाण्या बरोबरच शेतीवर या दुष्काळाचे मोठे
सावट आहे माणूस जनावरे या बरोबरच दिंडोरी च्या द्राक्ष बागांनाही पाणी
मिळणे आवश्यक असल्याचे नागरिक सांगत आहे
------------------
फोटो तळेगाव दिंडोरी येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा विहिरीवर
महिलांची पाण्यासाठी गर्दी. (१० दिंडोरी)