पर्यावरणाची समस्या Climate Justiceशिवाय सोडवता येऊ शकत नाही- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:39 PM2018-10-03T14:39:58+5:302018-10-03T14:40:20+5:30

संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला.

Environmental problems can not be solved without climate clearance- Modi | पर्यावरणाची समस्या Climate Justiceशिवाय सोडवता येऊ शकत नाही- मोदी

पर्यावरणाची समस्या Climate Justiceशिवाय सोडवता येऊ शकत नाही- मोदी

Next

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. दिल्लीत हा कार्यक्रम झाला असून, मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले,  भारत हा प्रकृतीला आईच्या रूपात पाहतो. हा आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांचा सन्मान आहे. या सर्वांचं आयुष्य हे प्रकृती नियमानुसारच सुरू आहे. भारतात महिलेचा सन्मान केला जातो. जी झाडांची निगा राखते. पर्यावरणाच्या समस्येचं गांभीर्य जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ती समस्या संपणार नाही. आम्ही प्रकृतीला सजीव मानलं आहे.

पर्यावरणाच्या बाबतीत भारताच्या संकल्पनेला आज जगानं स्वीकारलं आहे. पण हे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज आमच्या देशात गरिबांची संख्या कमी होत चालली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोक वर येत आहेत. पर्यावरण आणि प्रकृतीवर अतिरिक्त दबाव न टाकताही विकास करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरणाची समस्या Climate Justice शिवाय सोडवता येऊ शकत नाही. जगातल्या वेगानं शहरीकरण होणा-या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यातच शहरी जीवनाला स्मार्ट आणि अनुकूल बनवण्यासाठी बळ मिळतंय.


यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही भाषण केलं आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या, पॅरिस करारातून ज्यावेळी काही विकसित देशांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान बदलावर एक समिती बनवली होती, त्यावेळी त्यांनी पूर्ण सभेला दोन भागांमध्ये विभागलं होतं.
एक बाजूला पर्यावरणवादी तर दुस-या बाजूला विकासवाले आहेत. पर्यावरणवाद्यांनी प्रकृतीला नुकसान पोहोचवणा-या विकासाला विरोध केला आहे. मोदींनी सौर ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अँटोनिया गुट्येरेस यांनी कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: Environmental problems can not be solved without climate clearance- Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.