EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:10 PM2020-05-15T20:10:26+5:302020-05-15T20:13:15+5:30

लॉकडाऊन काळात जर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरता आला नाही तर त्यावर दंड आकारला जाणार नाहीय. कोरोनामुळे कंपन्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

EPFO big relief for 6.5 lakhs employers; no penalty for late EPF deposits in Lockdown hrb | EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात कर्मचाऱ्यांच्या हाती पैसा असावा म्हणून केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्याची मुभा दिली होती. तसेच बुधवारी अर्थमंत्र्यांनी कंपन्यांना पुढील तीन महिने १२ ऐवजी १० टक्के पीएफ भरण्याची सूट दिली होती. आता EPFO ने आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांना मोठी सूट दिली आहे. 


लॉकडाऊन काळात जर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरता आला नाही तर त्यावर दंड आकारला जाणार नाहीय. कोरोनामुळे कंपन्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेवर भरणे शक्य होणार नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेत जमा केला नाही तर दंड आकरते. मात्र, लॉकडाऊनमुळे जर कंपन्यांनी वेळेत पीएफ भरला नाही तर हा दंड माफ केला जाणार आहे. यामुळे कंपन्यांवर ताण येणार नाही, असे कामगार मंत्रालयाने जाहीर केले आहे. 


कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊनचा काळ वाढत आहे. यामुळे कंपन्यांना नेहमीप्रमाणे काम करणे शक्य नाहीय. यामुळे ते पीएफ भरू शकत नाहीत, असे या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचा ६.५ लाख कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच दंडाची रक्कम वाचणार आहे. 


३० एप्रिलला EPFO ने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये महिन्याचे ईसीआर वेगळा काढण्यास सांगितले होते. याचा अर्थ कंपन्यांना ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे भरण्याच्या तारखेनंतर द्यायचे आहेत, त्यांची माहिती EPFO ला द्यावी लागणार होती. आता ज्या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे, त्या कंपन्याही नव्या आदेशानुसार उशिराने पीएफ जमा करू शकणार आहेत. त्यांना आता कोणताही दंड केला जाणार नाहीय. सध्या ४८ लाख कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेवर भरला जात आहे. 
 

महत्वाच्या बातम्या...

राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची घोषणा

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

Web Title: EPFO big relief for 6.5 lakhs employers; no penalty for late EPF deposits in Lockdown hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.