EPFO कडून दिला जातोय ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, असा करा अर्ज...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:38 PM2022-08-16T13:38:13+5:302022-08-16T13:38:52+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) ग्राहकांना ७ लाख रुपयांचा अगदी मोफत लाभ मिळत आहे. पण यासाठी खातेधारकांना एक महत्वाचं काम करावं लागणार आहे.

epfo e nomination pf member nominee to get rs 7 lakh after filing e nomination here is step by step process | EPFO कडून दिला जातोय ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, असा करा अर्ज...!

EPFO कडून दिला जातोय ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, असा करा अर्ज...!

googlenewsNext

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) ग्राहकांना ७ लाख रुपयांचा अगदी मोफत लाभ मिळत आहे. पण यासाठी खातेधारकांना एक महत्वाचं काम करावं लागणार आहे. ई-नॉमिनेशनशी निगडीत हे काम आहे. जे ग्राहक आपल्या पीएफ खात्यावर ई-नॉमिनेशन फाइल करतील त्यांनाच ७ लाख रुपयांचा लाभ मिळवता येणार आहे. ईपीएफओनं एका नोटिफिकेशनमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. 

पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल. पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो. 

EPFO ची ई-नॉमिनेशन सुविधा सर्व खातेदारांसाठी लागू आहे. ई-नॉमिनेशनचे संपूर्ण काम डिजिटल पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाण्याचीही खातेधारकांना गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईपीएफओनं ई-नॉमिनेशन करण्याची संपूर्ण पद्धतही सांगितली आहे.

कसं फाइल कराल e-nomination
१. सर्वप्रथम तुम्हाला epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
२. यातील सर्व्हीस टॅबवर क्लिक करा आणि The employees ऑप्शनवर क्लिक करा.
३. यानंतर Member UAN/Online Service या ऑप्शनवर क्लिक करा.
४. पुढे e-Sewa Portal वर जाऊन सर्व आवश्यक माहिती नमूद करा
५. येथे तुम्हाला मॅनेजर टॅब दिसेल यात तुम्हाला YES पर्याय निवडावा लागेल आणि फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करावे लागेल. 
६. आपल्या कुटुंबीयांची सर्व माहिती नमूद करा.
७. आता Nomination Details वर क्लिक करा आणि शेअरिंग टक्केवारीची माहिती भरा
८. यानंतर ईपीएफ नॉमिनेशन डिटेल्स save करायला विसरू नका.
९. E-Sign पर्याय निवडा आणि ओटीपी जनरेट करा
१०. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP नमूद करा.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहकाचे ई-नॉमिनेशन पूर्ण होते. जर ग्राहकाने ई-नॉमिनेशन केले नाही, तर त्याच्या नॉमिनीला सामाजिक सुरक्षेशी संबंधित लाभ मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. हे टाळण्यासाठी ई-नॉमिनेशन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यावर ई-नॉमिनेशनचा लाभ नॉमिनीला मिळतो. अशा परिस्थितीत ई-नॉमिनेशन नोंदणी केल्यास नॉमिनीला ७ लाख रुपये दिले जातात. ग्राहकाने नॉमिनीचे नाव नमूद करणे आवश्यक आहे, यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. ग्राहक घरबसल्या त्यांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरुन ई-नॉमिनेशन दाखल करू शकतात. ईपीएफओ सदस्य वरील स्टेप्सचं पालन करून सहजपणे ई-नॉमिनेशन करू शकतात.

Web Title: epfo e nomination pf member nominee to get rs 7 lakh after filing e nomination here is step by step process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.