समान नागरी कायदा सहमतीशिवाय नाही - नायडू
By admin | Published: October 27, 2016 02:42 AM2016-10-27T02:42:35+5:302016-10-27T02:42:35+5:30
समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया
नवी दिल्ली : समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया नायडू यांनी केले.
वादग्रस्त विषय भाजप निवडणुकांमध्ये (विशेषत: उत्तर प्रदेश) मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी उपस्थित करीत असल्याचा आरोप नायडू यांनी फेटाळला. तीनवेळा तलाक, समान नागरी कायदा
आणि राम मंदिर या विषयांचा
वापर भाजप आगामी निवडणुकांमध्ये लाभासाठी करणार नाही तर निवडणुका विकासाच्या कार्यक्रमावर लढवू, असे नायडू म्हणाले.
असे महत्वाचे विषय हे निवडणुकीतील फायद्यांच्या चष्म्यातून बघितले जाऊ नयेत, असे सांगून
नायडू यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक्सला राजकीय
रंग दिल्या गेल्याचा विरोधकांचा
आरोप त्यांनी फेटाळला. तीन वेळा तलाक हा विषय सरकार धार्मिक समजत नाही तर तो लिंग समानतेचा आहे.
आम्ही मुस्लिमांच्या प्रश्नांत ढवळाढवळ करीत आहोत, असे
म्हणणे चूक आहे. भारतीय संसदेने व राजकीय व्यवस्थेने हिंदू संहिता विधेयक (कोड बिल), घटस्फोट कायदा, हिंदू विवाह कायद्यावर
बंदी, हुंड्यावर बंदी, सती प्रथेवर
बंदी विधेयके संमत केली, असे
त्यांनी म्हटले.
समान नागरी कायदा आणण्यासाठी व्यापक एकमताची गरज आहे. समान नागरी कायद्याबाबत विधी आयोगाने प्रश्नावली लोकांनी मते सांगावीत म्हणून जारी केल्याचे नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)
पाक कलाकारांवर बंदी नाही... पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास सरकारने बंदी घातलेली नाही, परंतु त्यांना कामे देताना चित्रपट निर्मात्यांनी लोकभावनेचा आदर ठेवला पाहिजे, असे नायडू म्हणाले.
भारतात इतर देशांतील कलाकारांना काम करण्यास बंदी घालण्याविरोधात मी आहे. परंतु शेजारच्या देशाकडून छुपे युद्ध सुरू असल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी ही परिस्थितीही लक्षात घेतली पाहिजे, असे व्यंकया नायडू म्हणाले.