एड्सग्रस्तांना समान हक्क देणारा कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:48 AM2018-09-12T03:48:35+5:302018-09-12T03:48:39+5:30
एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांना उपचार, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि रोजगारात समान हक्क बहाल करणारा महत्त्वाचा कायदा अमलात येणार आहे.
Next
नवी दिल्ली : एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांना उपचार, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि रोजगारात समान हक्क बहाल करणारा महत्त्वाचा कायदा अमलात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी एचआयव्ही आणि एड्स कायदा अधिसूचनेद्वारे जाहीर केला. हा कायदा उपचार, रोजगार मिळवणे, भाड्याचे घर मिळवणे आणि सरकारी व खासगी शिक्षण संस्थांत प्रवेशात भेदभावास मनाई करतो. राष्ट्रपतींकडून कायद्याला मान्यता मिळाल्यानंतरही भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची अधिसूचना का काढण्यात आली नाही, असे हायकोर्टाने विचारल्यानंतर हे पाऊल उचलले गेले.