सम-विषमविरुद्ध खासदाराची घोडेस्वारी
By admin | Published: April 28, 2016 04:12 AM2016-04-28T04:12:13+5:302016-04-28T04:12:13+5:30
दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार रामप्रसाद शर्मा यांनी बुधवारी घोड्यावरून प्रवास केला
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार रामप्रसाद शर्मा यांनी बुधवारी घोड्यावरून प्रवास केला. घोड्यावर स्वार होतच ते संसदेत पोहोचले. विशेष म्हणजे या घोड्याचे ‘प्रदूषणमुक्त वाहन’ असे नामकरण त्यांनी केले होते. तर दुसरीकडे अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारीदेखील सायकलवरून संसदेत पोहोचले होते.
सम-विषम योजनेतून खासदारांना सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे आमच्या कामात अडचणी येत असल्याचा दावा खासदारांनी केला आहे. यापूर्वी सोमवारी भाजपचे खासदार परेश रावल यांनी संसदेत येताना सम विषम नियमाचे उल्लंघन केले होते आणि त्यानंतर याबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल यांची क्षमाही मागितली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)