जिल्हा पातळीवरील यंत्रणा अधिक सुसज्ज करा; मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:24 AM2022-01-10T07:24:56+5:302022-01-10T07:25:23+5:30
मोदी म्हणाले की, कोरोनाचा विषाणूमध्ये सातत्याने परिवर्तन होत असते.
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करा. तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, असे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रविवारी दिले.देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, कोरोनाचा विषाणूमध्ये सातत्याने परिवर्तन होत असते. हे लक्षात घेऊन नव्या लसी, औषधे, चाचण्या यांच्याबाबत देशातील संस्थांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे. कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. त्यासाठीची जनचळवळ यापुढेही सुरू राहिली पाहिजे.