"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 08:53 PM2023-06-28T20:53:05+5:302023-06-28T20:53:52+5:30

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले भारताचे कौतुक.

Eric Garcetti, US Ambassador to India says 'Dreams become reality every day in India" | "भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते"

"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते"

googlenewsNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकताच अमेरिकेचा (America) दौरा केला. या दौऱ्यात भारत-अमेरिका यांच्यात अनेक करार करण्यात आले. यानंतर आता भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी (Eric Garcetti) यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, भारत-अमेरिकेची भागीदारी केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर असल्याचे वर्णन केले. 

बुधवारी IIT-दिल्ली येथील कार्यक्रमाला संबोधित करताना एरिक गार्सेट्टी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात जाहीर झालेले प्रकल्प आणि परिवर्तनात्मक उपक्रमांचा फायदा दोन्ही देशांनाच नाही तर जगालाही होईल. इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याची शक्ती भारत आणि अमेरिकेकडे आहे, असेही ते म्हणाले. 

'चहा ​​विक्रेता पंतप्रधान, शिक्षिक राष्ट्रपती'
एरिक गार्सेटी पुढे म्हणतात की, 'भारत एक असा देश आहे, जिथे दररोज स्वप्ने सत्यात उतरतात. दोन्ही देशात खूप साम्य आहे. भारतीय स्वप्ने आणि अमेरिकन स्वप्ने एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतात एक चहा विक्रेता भारताचे जागतिक स्तरावर नेतृत्व करतो, तर एक संथाली शिक्षिक राष्ट्रपती  (Draupadi Murmu) बनते…’

'भारताने अमेरिकेसोबत सर्वाधिक युद्धाभ्यास केला'
'इतर कोणत्याही देशापेक्षा भारत अमेरिकेसोबत सर्वाधिक लष्करी सराव करतो. आता वेळ आली आहे आपला दृष्टिकोन बदलण्याची, पुन्हा सेट करण्याची आणि प्रत्यक्षात आणण्याची. भारत आणि अमेरिकेने त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देण्याची आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करण्याची वेळ आली आहे,' असंही ते म्हणाले. 

Web Title: Eric Garcetti, US Ambassador to India says 'Dreams become reality every day in India"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.