तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:45 PM2020-08-25T13:45:14+5:302020-08-25T13:46:41+5:30
कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार आता एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) च्या योजनेचा विस्तार करणार आहे. याचा उद्देश अधिक पगार असलेल्या नोकरदारांना, कामगारांना ईएसआयसीच्या योजनांचा फायदा होऊ शकेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने ESIC च्या आरोग्य विमा योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे.
या प्रस्तावामध्ये ज्या कामगारांचा पगार 30000 रुपये आहे त्यांनादेखील आरोग्य विम्याचे संरक्षण आणि इतर फायदे देण्यात यावेत असे म्हटलेले आहे. सध्या ईएसआयसीच्या फायद्यांसाठी 21000 रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारीच पात्र होते. त्यांच्या पगारातील काही रक्कम ईएसायसीला जाते. यामुळे ते आरोग्य विम्याचे लाभार्थी होतात. अशा कामगारांना इन्शुअर्ड पर्सन म्हटले जाते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातील 0.75 टक्के आणि कंपनीकडून 3.25 टक्के रक्कम ESIC मध्ये जमा करते. याबदल्यात कर्मचाऱ्याला आरोग्य विमा आणि कॅश बेनिफिट दिले जातात.
एका सरकारी अधिकाऱ्यानुसार कामगार मंत्रालयाने आपल्या सर्व्हेमध्ये कोरोना संकटामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये ESIC सोबत जोडण्यासाठी सध्याच्या अटी शिथिल केल्या जाव्यात.
नोकरी गमावलेल्या कामगारांना दिलासा
कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या 24 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा
CoronaVirus: कोरोना लस: भारत आज मोठे पाऊल टाकणार; पुण्यावरच सारी मदार
Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?
IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत
Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप
Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले
Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी