सर्वसामान्यांना 1 एप्रिलपासून मोठा झटका बसणार, 'या' अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 02:27 PM2023-03-28T14:27:05+5:302023-03-28T14:27:32+5:30

Essential Drugs Price Hike: पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह जवळपास 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात.

essential drugs price to increase from 1st april | सर्वसामान्यांना 1 एप्रिलपासून मोठा झटका बसणार, 'या' अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार!

सर्वसामान्यांना 1 एप्रिलपासून मोठा झटका बसणार, 'या' अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना 1 एप्रिलला आणखी एक झटका बसणार आहे. आता लोकांना अत्यावश्यक औषधांसाठी आणखी पैसे खर्च करावे लागतील. 1 एप्रिलपासून पेनकिलर आणि अँटीबायोटिक्ससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicines Price Hike) किमती वाढणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलाच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना वाढ करण्याची परवानगी देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे.

सरकारने अधिसूचित केलेल्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) वार्षिक बदलामुळे 2022 च्या आधारावर किंमत 12.12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) सोमवारी सांगितले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा कंपन्या औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह जवळपास 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात. नॉन शेड्यूल औषधांच्या (Non-Scheduled Drugs) किमतीत परवानगीपेक्षा जास्त वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. दरम्यान, शेड्यूल औषधे म्हणजे ती औषधे, ज्यांच्या किमती नियंत्रित असतात. तर उर्वरित औषधे नॉन शेड्यूल्ड औषधांच्या कॅटगरीत येतात आणि त्यांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. मात्र, नियमानुसार नॉन शेड्यूल औषधांच्या किमती सरकारच्या परवानगीशिवाय वाढवता येत नाहीत.

या आधारे वाढवल्या जातात किंमती
औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला  (NPPA) मागील कॅलेंडर वर्षाच्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) नुसार दरवर्षी 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अनुसूचित फॉर्म्युलेशनच्या कमाल मर्यादा किंमतीत सुधारणा करण्याची परवानगी आहे. औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 च्या क्लॉज 16 मध्ये या संदर्भात नियम आहे. या आधारावर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी दरवर्षी औषधांच्या किमतीत सुधारणा करते आणि नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू होतात.

Web Title: essential drugs price to increase from 1st april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.