SC/ST साठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा, AMU ची मोदींकडे मागणी
By महेश गलांडे | Published: December 22, 2020 11:44 AM2020-12-22T11:44:45+5:302020-12-22T11:45:05+5:30
अलीगढ मुस्लीम विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. एससी आणि एसटी विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारकडे ठेऊन त्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करावी
लखनौ - उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचे यंदा शतकपूर्ती वर्षे साजरे होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्याअनुषंगाने येथील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या पाठवलेल्या संदेशपत्रात एसी आणि एसटीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली आहे. या विद्यापीठात एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे आरक्षण असावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अलीगढ मुस्लीम विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. एससी आणि एसटी विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारकडे ठेऊन त्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करावी, असेही विद्यार्थ्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच, अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयाच्या अल्पसंख्यांक संदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील बदलण्यात आलेलं शपथपत्र मागे घेण्यात यावं. विद्यापीठाकडून अल्पसंख्यांक चरित्राच्या सहकार्यासाठी नवीन शपथपत्र देण्यात यावं, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 नुसार जम्मू आणि काश्मीरला जो विशेष दर्जा देण्यात आलाय, तो पुन्हा लागू करावा, अशीही मागणी येथील विद्यार्थ्यांनी केलीय.