धिरयोच्या अभ्यासासाठी सभागृह समिती स्थापन
By Admin | Published: August 14, 2015 12:05 AM2015-08-14T00:05:13+5:302015-08-14T00:05:13+5:30
पणजी : रेड्यांच्या झुंजींना (धिरयो) कायदेशीर स्वरूप देणे शक्य आहे का, यावर अभ्यासासाठी सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन केली आहे. धिरयो हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे, असा दावा करून त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी सभागृह समिती नेमण्याची मागणी वाघ यांनी केली होती. सध्याच्या कायद्यानुसार ‘धिरयो’वर राज्यात बंदी आहे. सभागृह समितीवर आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कायतान सिल्वा, बेंजामिन सिल्वा आणि किरण कांदोळकर सदस्य आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, की ही समिती ‘धिरयो’ कायदेशीर करण्याबाबत अभ्यास करीलच, तसेच जनावरांप्रती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा तसेच अन्य संबंधित कायद्यांचाही अभ्यास करील. (प्रतिनिधी)
प जी : रेड्यांच्या झुंजींना (धिरयो) कायदेशीर स्वरूप देणे शक्य आहे का, यावर अभ्यासासाठी सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन केली आहे. धिरयो हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे, असा दावा करून त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी सभागृह समिती नेमण्याची मागणी वाघ यांनी केली होती. सध्याच्या कायद्यानुसार ‘धिरयो’वर राज्यात बंदी आहे. सभागृह समितीवर आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कायतान सिल्वा, बेंजामिन सिल्वा आणि किरण कांदोळकर सदस्य आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, की ही समिती ‘धिरयो’ कायदेशीर करण्याबाबत अभ्यास करीलच, तसेच जनावरांप्रती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा तसेच अन्य संबंधित कायद्यांचाही अभ्यास करील. (प्रतिनिधी)