इस्त्रोला शांतता पुरस्कार
By Admin | Published: March 28, 2015 02:01 AM2015-03-28T02:01:26+5:302015-03-28T02:01:26+5:30
उपग्रहआधारित सेवेतून देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ चा गांधी शांतता पुरस्कारासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहआधारित सेवेतून देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ चा गांधी शांतता पुरस्कारासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) निवड करण्यात आली आहे. एक कोटी, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी झालेल्या निवड मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.