10 वर्षांचं प्रेम! फेसबुकवर ओळख झाली, लग्न करण्यासाठी 'ती' थेट स्वीडनहून भारतात आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:07 PM2023-01-28T17:07:56+5:302023-01-28T17:08:52+5:30

सातासमुद्रापार स्वीडनहून आलेल्या एका प्रेयसीने भारतीय संस्कृतीनुसार आपल्या प्रियकराशी लग्न केल्याची घटना घडली आहे.

etah sweden girl reaches etah to tie knot with her facebook love engineer pawan | 10 वर्षांचं प्रेम! फेसबुकवर ओळख झाली, लग्न करण्यासाठी 'ती' थेट स्वीडनहून भारतात आली अन्...

10 वर्षांचं प्रेम! फेसबुकवर ओळख झाली, लग्न करण्यासाठी 'ती' थेट स्वीडनहून भारतात आली अन्...

Next

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात पाहायला मिळाला. सातासमुद्रापार स्वीडनहून आलेल्या एका प्रेयसीने भारतीय संस्कृतीनुसार आपल्या प्रियकराशी लग्न केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पार पडलेला हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. आता हा विवाह परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

स्वीडनहून एक तरुणी एटा जिल्ह्यातील अवगड शहरात पोहोचली. पवन या तरुणावर तिची फेसबुकवर ओळख झाली होती. दहा वर्षांपासून त्यांचं प्रेम होतं. दोघांनीही हिंदू रितीरिवाजाने लग्न केले. अवगड शहरातील रहिवासी असलेले गीतम सिंग हे मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतात. त्यांचा मुलगा पवन बीटेक केल्यानंतर डेहराडूनमध्ये नोकरी करतो. पवनची फेसबुकच्या माध्यमातून क्रिस्टनशी ओळख झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही फोन आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत बोलू लागले.

एक वर्षापूर्वी पवन आग्रा येथे गेला आणि तिला भेटला, जिथे दोघांनी प्रेमाचे प्रतिक ताजमहाल एकत्र पाहिले. यासोबतच त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. पवनने सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांना कोणताही आक्षेप नव्हता. लग्नाच्या कार्यक्रमामुळे पवनच्या घरात आनंदाचे वातावरण होते. हळद आणि मंडपाच्या कार्यक्रमानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात लग्न केले.

क्रिस्टन लिवर्ट प्रथम आग्रा येथे पोहोचली आणि नंतर अवगडला आली, जिथे दोघांनी जलसर रोडवर असलेल्या प्रेमा देवी शाळेत लग्न केले. वडील पिताम सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आम्ही या लग्नाशी पूर्णपणे सहमत आहोत. दुसरीकडे परदेशातून वधू आल्याची बातमी संपूर्ण परिसरात पसरली आणि दोघांचे लग्न पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: etah sweden girl reaches etah to tie knot with her facebook love engineer pawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न