घराच्या खोदकामादरम्यान सापडला मौल्यवान खजिना; सोन्याची वीट घेऊन पळाला मजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:18 AM2023-05-19T11:18:16+5:302023-05-19T11:19:06+5:30

घरमालकाने खोदकामादरम्यान सापडलेली नाणी पोलीस ठाण्यात जमा केली. मात्र, एक मजूर सोन्याची वीट घेऊन फरार झाल्याचीही चर्चा आहे. 

etawah moghul era gold brick and silver coin pot found during excavation of old house in auraiya | घराच्या खोदकामादरम्यान सापडला मौल्यवान खजिना; सोन्याची वीट घेऊन पळाला मजूर

फोटो - news18 hindi

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील कोतवाली भागातील मोहल्ला गुमती मोहलमध्ये एका घराच्या खोदकामादरम्यान एक वीट आणि काही नाणी सापडल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मजुरांच्या गोंधळामुळे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हा प्रकार पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. यानंतर घरमालकाने खोदकामादरम्यान सापडलेली नाणी पोलीस ठाण्यात जमा केली. मात्र, एक मजूर सोन्याची वीट घेऊन फरार झाल्याचीही चर्चा आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका भांड्यातून माती वाहून नेताना दिसत आहे. त्याने मातीच्या आत एक वीट लपवून ठेवल्याचे बोलले जात आहे. गुमटी मोहाल येथील रहिवासी दीपक यांच्या घरी बांधकाम सुरू आहे. जुनी भिंत पाडून माती खणताना मजुरांना एक वीट आणि काही नाणी मिळाली. ही वीट मुघलकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांनी वीट अष्टधातुची असल्याचे सांगितले. विटा आणि नाण्यांच्या मौल्यवानतेबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तपास करण्यात आला. 

कोतवालीचे प्रभारी पंकज मिश्रा यांनी सांगितले की, उत्खननादरम्यान विटा आणि काही जुनी नाणी सापडली आहेत. ही वीट कोणत्या धातूची आहे, यासाठी पुरातत्व विभागाला पत्र दिले जाणार आहे. त्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतरच वास्तव कळेल. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्षे बांधलेल्या घराच्या उत्खननात आधी सोन्या-चांदीने भरलेले भांडे सापडले आणि काही दिवसांनी मजुरांना सोन्याची वीट सापडली. 

एक मजूर खोदत असताना हा प्रकार कळला, त्यावेळी त्याला सोन्याची वीट सापडली आणि तो सोन्याची वीट घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही हे चित्र दिसत आहे. सध्या औरैयाचे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पंकज मिश्रा यांनी सांगितले की, जुनी नाणी घरमालक दीपक यांनी पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. त्याच्या चौकशीसाठी पुरातत्व विभागाला पत्र लिहिण्यात येत आहे. पुरातत्व विभागाचे पथक त्याची चौकशी करेल, तेव्हा हा खजिना कोणत्या काळातील आहे, हे वास्तव समोर येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: etawah moghul era gold brick and silver coin pot found during excavation of old house in auraiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.