पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अम‍ित शाहंचं मोठं विधान, ऐकून तुम्हीही खूश व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 10:25 AM2022-09-15T10:25:47+5:302022-09-15T10:26:44+5:30

Ethanol Blending Petrol: शाह म्हणाले, 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. ते सूरतत बाहेरील हजीरा येथे कृभकोच्या बायोइथेनॉल प्लांटच्या पायाभरणी दरम्यान बोलत होते. 

Ethanol blending in petrol BJP leader amit shah says achieving target of 20 percent ethanol by 2025 | पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अम‍ित शाहंचं मोठं विधान, ऐकून तुम्हीही खूश व्हाल!

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अम‍ित शाहंचं मोठं विधान, ऐकून तुम्हीही खूश व्हाल!

googlenewsNext

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आपणही खूश व्हाल. 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठल्यास, देशाच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल, असे शाह यांनी म्हटले आहे. 

शाह म्हणाले, 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. ते सूरतत बाहेरील हजीरा येथे कृभकोच्या बायोइथेनॉल प्लांटच्या पायाभरणी दरम्यान बोलत होते. 

पेट्रोलियम क्षेत्र संपूर्ण अर्थव्यवस्था बदलणार - 
सहकारमंत्री अम‍ित शाह म्हणाले, 'सरकारने 20 टक्के एथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. तसेच, आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन पेट्रोलियम क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलेल. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.' एथेनॉल म‍िश्रणामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या  किंमतींना लगाम लावण्यासहही मदत मिळेल. 

अमित शाह म्हणाले, कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैविक इंधन एक चांगला पर्याय आहे. याचे उत्पादन 2011-12 मधील 17.2 कोटी टनावरून वर्ष 2021-22 मध्ये 21.2 कोटी टन झाले आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने हे साध्य करण्यासाठी स‍िस्‍टिमॅट‍िक आणि वैज्ञानिक इथेनॉल नीती तयार केली आहे.' याच बरोबर, 'एवढे प्रयत्न करूनही, अमेरिका 55 टक्के इथेनॉलचे उत्पादन घेते. ब्राझील 27 टक्के तर भारत तीन टक्के इथेनॉलचे उत्पादन करते, असेही शाह म्हणाले.
 

Web Title: Ethanol blending in petrol BJP leader amit shah says achieving target of 20 percent ethanol by 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.