पेट्रोलमध्ये इथेनॉल; शेतकऱ्यांना मिळाले १४,४०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:01 AM2024-02-09T10:01:56+5:302024-02-09T10:02:16+5:30
ते म्हणाले की, सध्या इथेनॉलचे मिश्रण १२ टक्के आहे आणि ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे केंद्र सरकारची २४,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे, त्याचा बहुतांश फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.
ते म्हणाले की, सध्या इथेनॉलचे मिश्रण १२ टक्के आहे आणि ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना आहे. भारताची तेल आयात वाढल्याचे मान्य करून शेखावत यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या वतीने प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, इथेनॉल मिश्रणामुळे देशाला फायदा झाला. ‘गेल्या काही वर्षांत तेल आयातीवरील अवलंबित्व वाढले आहे. देशाची मागणी वाढत आहे,’ इथेनॉल मिश्रणामुळे गेल्या काही वर्षांत २४,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे. यापैकी ६० ते ७०% रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान १४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.