देशात जातीय दंगली वाढल्या

By admin | Published: August 3, 2015 02:34 AM2015-08-03T02:34:45+5:302015-08-03T02:35:13+5:30

२०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात

Ethnic riots in the country increased | देशात जातीय दंगली वाढल्या

देशात जातीय दंगली वाढल्या

Next


नवी दिल्ली : २०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात जातीय दंगलीच्या ३३० घटना घडल्या, ज्यात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, १०९२ जण जखमी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१५ ते जून २०१५ या सहा महिन्यांत जातीय दंगलीच्या ३३० घटना घडल्या. २०१४मध्ये पहिल्या सहा महिन्यांत अशा २५२ घटना घडल्या होत्या. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमधील जातीय दंगलीच्या घटनांमध्ये ३३ जण मृत्युमुखी पडले होते. २०१४ या वर्षभरात देशात ६४४ दंगली घडल्या आणि त्यात ९५ जण मारले गेले, तर १९२१ जखमी झाले होते.
भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांत जातीय दंगलीच्या २५ घटना घडल्या आणि त्यात ७ जण मारले गेले तर ७९ जखमी झाले. गेल्या वर्षी राज्यात दंगलीच्या ७४ घटना घडल्या होत्या, ज्यात ७ जण मारले गेले होते आणि २१५ जखमी झाले होते. काँग्रेसशासित कर्नाटकात गेल्या सहा महिन्यांत ३६
दंगली घडल्या, ज्यात २ जण मारले गेले, तर १२३ जखमी झाले. या राज्यातील गतवर्षीचा दंगलीचा आकडा ७३ आहे. त्यात ६ जण मारले गेले होते आणि १७७ जखमी झाले होते.
महाराष्ट्रात दंगलींची संख्या घटली
भाजपाचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात गेल्या जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांच्या काळात सांप्रदायिक दंगलीच्या ५९ घटना घडल्या. यात ४ मारले गेले आणि १९६ जखमी झाले. २०१४ या वर्षी महाराष्ट्रात ९७ सांप्रदायिक दंगली घडल्या, ज्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १९८ जण जखमी झाले होते.

Web Title: Ethnic riots in the country increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.