युरोपीय संघ आणखी भारतीयांना सामावून घेणार
By admin | Published: February 23, 2017 01:24 AM2017-02-23T01:24:39+5:302017-02-23T01:24:39+5:30
अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे नियम कडक करून नाकेबंदी करण्याच्या हालचाली चालविल्याने चिंतेत असलेल्या
नवी दिल्ली : अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे नियम कडक करून नाकेबंदी करण्याच्या हालचाली चालविल्याने चिंतेत असलेल्या भारतीय आयटी व्यावसायिकांना युरोपीय संघाकडून (ईयू) दिलासा मिळाला आहे. आणखी भारतीय आयटी व्यावसायिकांना सामावून घेऊ, अशी घोषणा युरोपीय संघाने केली आहे.
युरोपीय संसदेच्या विदेश व्यवहार विषयक समितीचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाने ही भूमिका मांडली. शिष्टमंडळाचे प्रमुख डेव्हीड मॅकअॅलिस्टर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, मागणी असलेल्या लोकांसाठी युरोपीय संघाची दारे खुली आहेत. मॅकअॅलिस्टर म्हणाले की, युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील व्यापक आधारावरील व्यापार आणि गुंतवणूक कराराच्या थांबलेल्या वाटाघाटी लवकर सुरू व्हायला हव्या. या कराराने दोन्ही बाजूंनी व्यापारास प्रोत्साहन मिळणार आहे.