पर्वणीच्या दिवशी तलाठी पदाची परीक्षा प्रशासन अडचणीत : लिपिकांना गणराज पावले

By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30

नाशिक : राज्यपातळीवर घेण्यात येणार्‍या महसूल खात्यातील तलाठी पदासाठी शासनाने रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वात मोठी पर्वणी भरणार आहे, त्यासाठी महसूल यंत्रणा अगोदरच पर्वणीच्या नियोजनात गुंतलेली असताना परीक्षा कशी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला असून, या संदर्भात राज्य शासनाला अवगत करूनही परीक्षा याच दिवशी होणार हा हेका कायम ठेवला आहे. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या काळात होणारी लिपिक पदाची परीक्षा मात्र शासनाने थेट ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने तलाठी पदाच्या परीक्षेचे भवितव्य धोक्यात आले आहे.

On the eve of the festival, for the administration of the talathi post, | पर्वणीच्या दिवशी तलाठी पदाची परीक्षा प्रशासन अडचणीत : लिपिकांना गणराज पावले

पर्वणीच्या दिवशी तलाठी पदाची परीक्षा प्रशासन अडचणीत : लिपिकांना गणराज पावले

Next
शिक : राज्यपातळीवर घेण्यात येणार्‍या महसूल खात्यातील तलाठी पदासाठी शासनाने रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वात मोठी पर्वणी भरणार आहे, त्यासाठी महसूल यंत्रणा अगोदरच पर्वणीच्या नियोजनात गुंतलेली असताना परीक्षा कशी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला असून, या संदर्भात राज्य शासनाला अवगत करूनही परीक्षा याच दिवशी होणार हा हेका कायम ठेवला आहे. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या काळात होणारी लिपिक पदाची परीक्षा मात्र शासनाने थेट ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने तलाठी पदाच्या परीक्षेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
नाशिक जिल्‘ातील तलाठ्यांच्या ३८ व लिपिकाच्या आठ पदांसाठी राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध करून शासनाने इच्छुकांकडून अर्ज मागविले असून, राज्य पातळीवर ज्या ज्या जिल्‘ात उपरोक्त पदे रिक्त असतील तेथेही पद भरण्यास अनुमती देऊन एकाच वेळी त्यासाठी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जेणे करून एकाच वेळी परीक्षा घेतल्यास त्या त्या जिल्‘ातील इच्छुकांना न्याय मिळू शकतो तसेच प्रत्येक जिल्‘ात अर्ज करणार्‍यांनाही अटकाव बसू शकतो. शासनाने रिक्तपदे भरण्याची अनुमती देतानाच परीक्षेच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. त्यात तलाठी पदासाठी १३ सप्टेंबर, तर लिपिक पदासाठी २० सप्टेंबर ही तारीख अगोदर निश्चित करण्यात आली होती. तथापि, कोकणात गौरी-गणपतीसाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणवासीय जात असल्यामुळे त्यांची परीक्षेची संधी हुकू नये म्हणून मंत्रालयात बसलेल्या कोकणच्या अधिकार्‍यांनी लिपिक पदाची परीक्षा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे, तर सिंहस्थाची दुसरी महत्त्वाची पर्वणी १३ सप्टेंबर रोजी असून, या दिवशी नाशिक येथे कोट्यवधी भाविक बाहेरगावाहून येण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वत्र काटेकोर बंदोबस्त तसेच पर्वणी पार पाडण्यासाठी महसूलसह अन्य खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना कुंभमेळ्याची कामे वाटप करण्यात येणार आहे. खुद्द शहरातीलही काही रस्ते रविवारी पर्वणीच्या दिवशी बंद राहतील अशा परिस्थितीत बाहेरगावाहून तलाठी परीक्षा देण्यासाठी येणार्‍या हजारो इच्छुकांच्या परीक्षेची सोय कशी करायची तसेच ते परीक्षेला येऊ शकतील किंवा नाही याविषयी प्रशासनही काळजीत पडले आहे.
(जोड आहे)

Web Title: On the eve of the festival, for the administration of the talathi post,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.