१२ तासानंतरही आरोपींचा सुगावा नाही-
By admin | Published: March 23, 2017 05:16 PM2017-03-23T17:16:25+5:302017-03-23T17:16:25+5:30
१६ मार्च रोजी अण्णा गँगने कारमधून रोख व दागिने लुटले होते. अण्णा गँग शहरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती. परंतु कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात न आल्याने या गँगने पाच लोकांना लुटले होते. यानंतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी महत्त्वाच्या स्थळी लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. सिव्हील लाईन्समधील बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना यापूर्वी सुद्धा अनेकदा लुटण्यात आले आहे. ताजे प्रकरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
Next
१ मार्च रोजी अण्णा गँगने कारमधून रोख व दागिने लुटले होते. अण्णा गँग शहरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती. परंतु कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात न आल्याने या गँगने पाच लोकांना लुटले होते. यानंतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी महत्त्वाच्या स्थळी लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. सिव्हील लाईन्समधील बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना यापूर्वी सुद्धा अनेकदा लुटण्यात आले आहे. ताजे प्रकरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. बॉक्स... हेल्मेटचा वापर लुटारुंनी आपली ओळख लपविण्यासाठी हेल्मेटचा वापर केला होता. यातून ते सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. लुटारुंना शोधण्यासाठी पोलीस सराईत गुन्हेगार व संशयित गुन्हेगारांची धरपकड करीत आहे. आरोपी न सापडल्याने पोलिसांवरील कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. पोलीस संख्येच्या आधारावर चेन स्नॅचिंग कमी झाल्याचा दावा करीत आहे. परंतु १६ मार्चपासून आतापर्यंत चेन स्नॅचिंग आणि लुटण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. सोमवार व मंगळवारी सुद्धा दोन महिलांना लुटण्यात आले होते. - तर आमचे काय होणार या घटनेमुळे सामान्य नागरिक अतिशय घाबरलेले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच लुटले जात असेल तर आमचे काय होणार. त्यांची ही भीती स्वाभाविक आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम पोलिसांना रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सकारात्मक परिणाम मिळू शकलेले नाही. ---------------------------------------