२४ तासानंतरही एकनाथ शिंदे यांची भूमिका अस्पष्टच; शिवसेनेशी झालेल्या चर्चा निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:10 PM2022-06-21T21:10:49+5:302022-06-21T21:11:46+5:30

दोन अपक्ष आमदार व शिवसेनेच्या महिला आमदार पुन्हा या गटात सामील होण्यासाठी सुरतला दाखल झाल्याने नाराज आमदारांची संख्या वाढतत असल्याचे चित्र आहे.

even after 24 hours eknath shinde role is unclear discussions with shiv sena were fruitless | २४ तासानंतरही एकनाथ शिंदे यांची भूमिका अस्पष्टच; शिवसेनेशी झालेल्या चर्चा निष्फळ

२४ तासानंतरही एकनाथ शिंदे यांची भूमिका अस्पष्टच; शिवसेनेशी झालेल्या चर्चा निष्फळ

Next

रमाकांत पाटील

सूरत: शिवसेनेचे गटनेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करीत आपल्या समर्थक आमदारांसह सुरत येथे एका हॉटेलमध्ये तळ ठोकला असला तरी २४ तासानंतरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने विविध तर्क लावले जात आहे. दरम्यान, नाराज आमदारांशी चर्चा करण्यासाठी आलेले शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर व आमदार रवींद्र फाटक यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र चर्चा निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. त्यांनीही पत्रकारांना चकवा देत मुंबईची वाट धरली. 

मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नाराज आमदार सोमवार रात्रीपासून सुरत येथे मुक्कामी आहेत. मंगळवारी दिवसभर अनेक राजकीय घडामोडी मुंबई आणि दिल्लीत घडल्या. पण सर्वांचे लक्ष मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेकडे लागले होते. दिवसभरात दोन अपक्ष आमदार व शिवसेनेच्या महिला आमदार पुन्हा या गटात सामील होण्यासाठी सुरतला दाखल झाले. त्यामुळे नाराज आमदारांची संख्या वाढतत असल्याचे चित्र आहे.

या नाराजी नाट्यामुळे महाराष्ट्र सरकार पडणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. नाराज गटाच्या मनधरणीसाठी शिवसेनेने दोन जणांचे शिष्टमंडळ पाठविले होते. मात्र त्यांनीही दोन तास चर्चा केल्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले. हे शिष्टमंडळ गेल्यानंतर किमान मंत्री एकनाथ शिंदे हे आपली भूमिका मांडतील अशी अपेक्षा असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले होते. मात्र त्यांनीही २४ तास उलटल्यानंतरही आपली भूमिका स्पष्ट न केल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. सरकार पाडण्यासाठी पुरेसे संख्याबळ जुळत नसल्याने भूमिका मांडण्यासाठी विलंब होत असल्याचा कयास लावला जात आहे. 

आमदार लता सोनवणे या आपल्या पतीसह दुपारी चारच्या सुमारास दिल्लीहून विमानाने सुरत येथे दाखल झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या सोबतच दुपारी दोन अपक्ष आमदार स्वतंत्रपणे हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
 

Web Title: even after 24 hours eknath shinde role is unclear discussions with shiv sena were fruitless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.