"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 11:07 AM2021-03-19T11:07:18+5:302021-03-19T11:11:47+5:30

Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat comment on women ripped jeans : मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद.

even after being trolled tirath singh rawat did not change said there is still problem with ripped jeans | "...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे सध्या सध्या आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वच स्तरातून रावत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. महिला नेत्यांनी यावरून निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. 

तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.

"आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार आहेत?"; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."

"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही  प्रभू रामासोबत केली होती. 

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, उर्मिला मातोंडकर यांचा खोचक सवाल

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (tirath singh rawat) यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा घडत आहेत. रावत यांच्या विधानानंतर अनेक महिला नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यात आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (urmila matondkar )यांनीही ट्विट करत रावत यांच्या विधानावरुन भाजपला टोला लगावला आहे. "फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा नक्की सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय करणार?", असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: even after being trolled tirath singh rawat did not change said there is still problem with ripped jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.