नोटाबंदीनंतरही जीडीपीचा दर सात टक्के
By admin | Published: March 1, 2017 04:44 AM2017-03-01T04:44:47+5:302017-03-01T04:44:47+5:30
सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या आकड्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विपरीत परिणामाचा अंदाज उडवून लावला
नवी दिल्ली : सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या आकड्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विपरीत परिणामाचा अंदाज उडवून लावला असून, आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय्ौ सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.१ टक्के राहील, असा अंदाज आहे.
जानेवारीत जारी करण्यात आलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजातही या वर्षाचा वृद्धीदर ७.१ टक्केच गृहीत धरण्यात आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील आकडे सांख्यिकी कार्यालयाने थोडेसे सुधारून अनुक्रमे ७.२ टक्के आणि ७.४ टक्के केले आहेत. तिसऱ्या तिमाहीच्या मध्यात ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. नोटाबंदीनंतर देशातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे या तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर घसरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २0१६-१७ या वर्षातील जीडीपी १२१.६५ लाख कोटी रुपयांवर जाईल. जानेवारीमधील पहिल्या सुधारित अंदाजात हा आकडा ११३.५८ लाख कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. या वर्षात जीडीपीचा वृद्धीदर ७.१ टक्के राहील. २0१५-१६ मध्ये तो ७.९ टक्के होता. वास्तविक जीव्हीए (सकळ मूल्यवर्धित) १0४.७0 लाख कोटी राहील. २0१५-१६ मध्ये तो १११.६८ कोटी रुपये होता. (वृत्तसंस्था)