निवडणुका कधी घ्यायच्या यावरून अद्याप आयोगाचा खल सुरूच

By admin | Published: September 9, 2014 05:22 AM2014-09-09T05:22:55+5:302014-09-09T18:17:12+5:30

काश्मिरमधला पूराचा हाहाकार व महाराष्ट्रात निवडणुका कधी घ्यायचा यात सहमतीचा अभाव यामुळे घोषणा कदाचित लांबणीवर पडेल

Even after the elections, there is still no reason for the commencement of elections | निवडणुका कधी घ्यायच्या यावरून अद्याप आयोगाचा खल सुरूच

निवडणुका कधी घ्यायच्या यावरून अद्याप आयोगाचा खल सुरूच

Next

ऑनलाइन टीम

 नवी दिल्ली : मंगळवारी पत्रकारपरिषद घ्यायचे संकेत निवडणूक आयोगाने दिले खरे, परंतु दिवसभर चाललेल्या बैठका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत न संपल्याने निवडणुका कधी घ्यायचा यावर एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी पत्रकारपरिषद घेऊन राज्यांतल्या निवडणुकांच्या तारखा घोषित होतील अशी शक्यता, सोमवारी वर्तवण्यात आली. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळपासून बैठकांमध्ये गुंतले. परंतु मंत्रिमंडळ सचिव व गृहसचिव यांच्यामध्ये तारखांवरून एकमत होत नसल्याने विलंब होत असल्याचे राजधानीतील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रासह काश्मिर, झारखंड व हरयाणा या राज्यांमध्ये निवडणूका अपेक्षित असून काश्मिरमधल्या सध्याच्या पूरस्थितीचा परिणाम तारखांवर झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

तसेच झारखंडमधल्या निवडणुकांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधल्या नेत्यांसोबत बैठका घेत असून त्याचेही पडसाद निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकावर पडेल असा अंदाज आहे.

निवडणूक आयोगाच्या बैठका कधी संपतात, व आज पत्रकार परिषद होऊन निवडणूका जाहीर होतात व आचारसंहिता लागू होते की एक दिवस थांबावा लागेल हे रात्रीपर्यंत स्पष्ट होईल

.२१ ऑक्टोबरपासून दिवाळी असून, तत्पूर्वी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान २८८ जागांसाठी दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली  होती.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव पार पडण्याची आयोगाला प्रतीक्षा होती. दिवाळीतही निवडणुकीचे विघ्न नको म्हणून त्याआधीच मतदान आणि मतमोजणी पार पाडली जाईल. 

Web Title: Even after the elections, there is still no reason for the commencement of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.