स्वातंत्र्यानंतरही मुरु मह˜ी विकासापासून दूर

By admin | Published: July 6, 2016 09:18 PM2016-07-06T21:18:04+5:302016-07-07T00:53:42+5:30

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरत

Even after Independence, Muruga is far away from important development | स्वातंत्र्यानंतरही मुरु मह˜ी विकासापासून दूर

स्वातंत्र्यानंतरही मुरु मह˜ी विकासापासून दूर

Next

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरत
पूल बांधण्याच्या मागणीला केराची टोपली

पेठ : भारताला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लोटला असतांना सुध्दा अजून काही गावांना साध्या मुलभूत सुविधाही मिळाल्या नसल्याने आदिवासी वाडी वस्तीवरील जनता आजही विकासाकडे डोळे लाऊन असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पेठ तालुक्यातील मुरु मह˜ी हे असेच एक पाडेवजा लहानसे नाव मात्र या गावाला पावसाळ्यात जायचे झाल्यास एक तर नदीतून पोहत जावे लागेल नाहीतर विसपंचवीस किमीचा फेरा घेऊन तरी जावे लागेल. या गावाला जातांना एक मोठा नाला आडवा आहे. या नदीला बाराही महिने पाणी असते शिवाय पावसाळयात पूर येत असल्याने गावचा संपर्क तुटतो.
अशा वेळी कोणी आजारी पडले अथवा काही अकस्मात घटना घडल्याच रु ग्णांना डोलीवर बसवून नदी पार करावी लागते वेळेस उपचार मिळू शकत नसल्याने अनेकांना आपला जीव गमावण्याची बिकट परिस्थिती या गावावर ओढवली असून अनेक वेळा शासन दरबारी या नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी करण्यात आली असतांना निवडणूकीच्या प्रारंभी दिलेले आश्वासन निवडणूका झाल्यावर सर्वच विसरतात याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यमान लोकप्रतिनिधी आता तरी या गावापर्यंत पोहचतील की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे. ( वार्ताहर)

Web Title: Even after Independence, Muruga is far away from important development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.