...तर ब्राह्मणपुत्रांनाही आहे आरक्षणाचा अधिकार
By Admin | Published: February 23, 2017 04:06 PM2017-02-23T16:06:09+5:302017-02-23T16:25:12+5:30
ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या व्यक्तीला एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीने दत्तक घेतलं असेल तरी त्याला आरक्षणाचा फायदा मिळेल, उच्च न्यायालयाचा निर्णय
>ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 23 - ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या व्यक्तीला एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीने दत्तक घेतलं असेल तरी त्याला आरक्षणाचा फायदा मिळेल असा निर्णय पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षणाच्या नियमांनुसार त्या व्यक्तीला सरकारी नोकरीही मिळू शकते असं न्यायालयाने म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संगरूर येथील रहिवासी रातेज भारतींच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. भारती यांना एका सरकारी शाळेतून 20 वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यावर पंजाब सरकारने हटवलं होतं. कारण, त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता मात्र, त्यांना अनुसूचित जातीतील एका दाम्पत्याने विकत घेतलं होतं.
भारती यांचे जन्मदाते वडील तेज राम यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं होतं. त्यानंतर 1977 मध्ये त्यांनी भारती यांनाचांद सिंग आणि त्यांची पत्नी भानो जे अनुसूचित जातीतील आहेत त्यांना दत्तक दिलं होतं.