निवडणुकांपूर्वीच भाजपाकडून 40 पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना पक्षातून डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 08:33 PM2019-09-29T20:33:28+5:302019-09-29T20:33:37+5:30

भाजपाने केलेल्या कारवाईत कार्यकर्त्यांपासून ते बुथप्रमुख, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, मीडिया प्रमुख यांसह महामंत्री पदांच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Even before the elections, 40 BJP office bearers and worker will be demoted from the party in uttarakhand | निवडणुकांपूर्वीच भाजपाकडून 40 पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना पक्षातून डच्चू

निवडणुकांपूर्वीच भाजपाकडून 40 पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना पक्षातून डच्चू

Next

भारतीय जनता पार्टीने 40 पदाधिकारी आणि सदस्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. उत्तराखंड राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय पातळीवरील आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे भाजपाकडून ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या संस्थेनं दिलं आहे. विशेष म्हणजे या यादीत महामंत्री पदावरील व्यक्तींचाही समावेश आहे. 

भाजपाने केलेल्या कारवाईत कार्यकर्त्यांपासून ते बुथप्रमुख, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, मीडिया प्रमुख यांसह महामंत्री पदांच्या व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यातील पोटनिवडणुकांच्या उमेदवारी घोषणेनंतर पक्षविरोधी कार्यवाहीची दाट शक्यता आहे. तसेच, अनेकजण बंडखोरीही करू शकतात. त्यामुळे, भाजपाने उत्तराखंडमध्ये 40 सदस्यांना पक्षातून काढून एक धडा दिला आहे. नुकतेच भाजपाने विधानसभा पोटनिवडणुकांच्या 32 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, महाराष्ट्र आणि हरयाणातील उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर होईल, असे दिसून येते. 

Web Title: Even before the elections, 40 BJP office bearers and worker will be demoted from the party in uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.