तीनपैकी एक अपत्य दत्तक दिले तरी निवडणूक लढविण्यास अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:59 AM2018-10-26T03:59:28+5:302018-10-26T03:59:34+5:30

तीन अपत्यांना जन्म दिल्यास व त्यातील एक अपत्य जरी दत्तक दिलेले असले तरी ती व्यक्ती पंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरते.

Even if one of the three adoptions is ineligible for contesting elections | तीनपैकी एक अपत्य दत्तक दिले तरी निवडणूक लढविण्यास अपात्र

तीनपैकी एक अपत्य दत्तक दिले तरी निवडणूक लढविण्यास अपात्र

googlenewsNext

नवी दिल्ली : तीन अपत्यांना जन्म दिल्यास व त्यातील एक अपत्य जरी दत्तक दिलेले असले तरी ती व्यक्ती पंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरते. ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचही बनू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे.
दोन अपत्ये असणाऱ्यालाच ग्रामपंचायत निवडणूक लढविता येते, तसेच सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य होता येते, अशी तरतूद पंचायती राज कायद्यात आहे. ओदिशामधील एका ग्रामपंचायत सदस्याला तीन मुले होती. त्यातील एक मूल त्याने दत्तक दिले होते. मात्र, तीन मुलांना जन्म दिल्याच्या कारणास्तव त्याला अपात्र ठरविण्यात आले. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.एस. कौल, न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
आपल्याला झालेल्या मुलांपैकी एखादे मूल दत्तक देण्यास हिंदू दत्तक व देखभाल कायद्यान्वये परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या कायद्याचा आधारही पंचायत राज कायद्यातील तरतुदींना नाही. सरपंचपदी राहण्यास मीनासिंग माझी याला न्यायालयाने मनाई केली.
>पहिला मुलगा दिला होता दत्तक
मीनासिंगला पहिली दोन मुले १९९५ व १९९८ साली झाली. तो फेब्रुवारी २००२ मध्ये सरपंचपदी निवडून आला. त्याच्या तिसºया मुलाचा जन्म आॅगस्ट २००२ मध्ये झाला. त्यामुळे पंचायत राज कायद्यातील तरतुदीनुसार तो अपात्र ठरला. त्याने आपला पहिला मुलगा १९९९ साली एकाला दत्तक दिला होता.

Web Title: Even if one of the three adoptions is ineligible for contesting elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.