भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचाच गाैप्यस्फाेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:46 AM2022-04-04T06:46:01+5:302022-04-04T06:47:37+5:30

BJP Politics News: गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, माेदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच ही बाब उघड केली आहे.

Even in BJP, there is huge resentment over the top leadership, Says cabinet minister in the Maedi government | भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचाच गाैप्यस्फाेट

भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचाच गाैप्यस्फाेट

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, माेदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच ही बाब उघड केली आहे. हिंमत असेल, तर माेदींनी आपली मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून दाखविण्याची धमकी दिल्याचा दावाही मंत्र्याने केला आहे. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही मतभेद असल्याचा दावा या मंत्र्याने केला  आहे.

माेदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदावर असलेल्या या मंत्र्याने अनाैपचारिक चर्चेत ‘लाेकमत’कडे अनेक गाेष्टींचा गाैप्यस्फाेट केला. त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी काही याेजनांबाबत भूमिका मांडली हाेती. ती फेटाळताना माेदींनी दुखावणारे वक्तव्य केले हाेते. त्यावेळी हिम्मत असेल, तर मला मंत्रिमंडळातून काढून दाखवा, अशी मी माेदींना थेट धमकी दिली हाेती. माझ्यासाेबत २५२ खासदार असून, काेणत्याही क्षणी माेदी सरकार पाडण्याचे सामर्थ असल्याचा दावाही या मंत्र्याने केला आहे. माेदी आणि अमित शहांमध्येही सारे काही ठीक नसल्याचे संकेतही त्यांनी या चर्चेतून दिले.
माेदी आत्मप्रेमात मग्न आहेत. संसदेत आपल्या भाषणावर काेणी किती टाळ्या वाजविल्या, हे माेदी स्वत:च्या चेंबरमध्ये बसून माेजत असल्याचेही या मंत्र्याने सांगितले. 

राजनाथ पुत्राचे मंत्रिपद माेदींनी राेखले
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज यांना याेगी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यापासून माेदींनी राेखले हाेते, असा खळबळजनक गाैप्यस्फाेटही या मंत्र्याने केला आहे. राजनाथ सिंह हे आतापर्यंत माेदींशी वाद घालत हाेते. मात्र, त्यांनीही आता शस्त्रे म्यान केली आहेत, असे या मंत्र्याने सांगितले.

तपाससंस्थांचा विराेधकांविराेधात वापर
सीबीआय, ईडी, आयटी यांसारख्या संस्थांचा माेदी विराेधकांविराेधात वापर करत असल्याची टीकाही या मंत्र्याने केली आहे. माेदींच्या या धाेरणाचा मी विराेध केला हाेता. मात्र, मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास याच धाेरणाचा वापर करून पार केल्याचे माेदींनी त्यावेळी उत्तर दिले हाेते. 

Web Title: Even in BJP, there is huge resentment over the top leadership, Says cabinet minister in the Maedi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.