बरे होणारे दुसऱ्या दिवशीही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 06:10 AM2020-09-21T06:10:47+5:302020-09-21T06:11:00+5:30

एकूण रुग्णसंख्या ५४ लाखांवर; आजवर ८६,७५२ जणांचा बळी

Even more so on the second day of healing | बरे होणारे दुसऱ्या दिवशीही जास्त

बरे होणारे दुसऱ्या दिवशीही जास्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशामध्ये सलग दुसºया दिवशी बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक झाली आहे. रविवारी कोरोनाचे ९२,६०५ रुग्ण आढळले, तर ९४,६१२ जण या आजारातून बरे झाले. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५४ लाखांवर पोहोचली आहे. या संसर्गामुळे आणखी १,१३३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ८६,७५२ झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५४,००६१९ झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या ४३,०३,०४३ झाली असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७९.६८ टक्के आहे. सध्या देशात १०,१०,८२४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १८.७२ टक्के आहे. रुग्णांचा मृत्यूदर १.६१ टक्के इतका कमी राखला आहे.


सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोनाचे ६९ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसºया क्रमांकावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा १४ लाखांनी कमी आहे. दोन्ही देशांमधील रुग्णसंख्येतला फरक दिवसेंदिवस कमी होत आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्येने २० लाखांचा पल्ला ७ आॅगस्ट रोजी गाठला होता. त्यानंतर २३ आॅगस्ट रोजी ३० लाखांचा, ५ सप्टेंबर रोजी ४० लाखांचा व १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांचा पल्ला कोरोना रुग्णसंख्येने गाठला होता. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूत ८,७५१, कर्नाटकमध्ये ७,९२२, आंध्र प्रदेशमध्ये ५,३०२, उत्तर प्रदेशमध्ये ४,९५३, दिल्लीत ४,९४५, पश्चिम बंगालमध्ये ४,२९८, गुजरातमध्ये ३,३०२, पंजाबमध्ये २,७५७, मध्यप्रदेशमध्ये १,९४३ आहे.


चाचण्यांची संख्या
६ कोटी ३६ लाखांवर

च्इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १९ सप्टेंबर रोजी १२,०६,८०६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. च्त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ६,३६,६१,०६० झाली आहे.

Web Title: Even more so on the second day of healing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.