ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोप
By admin | Published: August 3, 2015 12:13 AM2015-08-03T00:13:31+5:302015-08-03T00:13:31+5:30
नाशिक : गोदाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार आणि रोज होणारी मांसविक्री दि. ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर २०१५ या दोन महिन्यांच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे. भाविकांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने सदर निर्णय घेतला आहे.
येत्या १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचे ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर पहिली पर्वणी २९ आॅगस्टला होत आहे. रामकुंडावर पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गोदाघाट परिसराची स्वच्छता ठेवण्यावर महापालिकेकडून प्राधान्याने भर दिला जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी शाही मार्गाची पाहणी करतेवेळी गोदाघाटावर भरणारा मांस, मच्छी आणि बोंबील बाजार बंद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने दि. ५ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी गोदाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय घाटावर रोज भरणारा मांस, मच्छी आणि बोंबील बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. गंगाघाट परिसर, म्हसोबा पटांगण तसेच गौरी पटांगणावर दोन महिने कुणालाही भाजीविक्री अथवा मांसविक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. नाशिक येथे १८ सप्टेंबरला तर त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला अखेरची पर्वणी आहे. तोपर्यंत आठवडे बाजार भरणार नाही. बुधवार, दि. ७ आॅक्टोबरलाच आता आठवडे बाजार भरणार आहे. (प्रतिनिधी)
४स्वच्छतेसाठी
निर्माल्य कलशमहापालिकेमार्फत गोदाघाटावर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. रामघाटावर सुमारे ६० निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून, भाविकांनी या कलशातच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर पटांगणालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या मागील जागेत घाण-कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार असून, संबंधितांवर लक्ष ठेवण्यात येणार आले.