ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोप
By Admin | Published: August 3, 2015 12:13 AM2015-08-03T00:13:32+5:302015-08-03T00:13:32+5:30
>ऑलिम्पिकआधीच सुरक्षाप्रमुखांची उडाली झोपरियो डि जनेरियो : दरोडे, प्रेक्षकांतील हिंसा आणि दहशतवादी हल्ले अशा सर्व काही संभाव्य शक्यता आहेत. त्यामुळे २0१६ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या एक वर्षाआधीच ऑलिम्पिक सुरक्षाप्रमुखांची झोप उडाली आहे.रिओ ऑलिम्पिकमध्ये १0 हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय लाखो प्रेक्षकांनाही सुरक्षा पुरवायची आहे. कोणताही धोका न पत्करता ८५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, जे की २0१२ लंडन ऑलिम्पिकच्या २0 हजार सुरक्षा कर्मचार्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक असल्याचे रियोच्या अधिकार्यांनी सांगितले.ब्राझील हे हिंसेसाठी बदनाम आहे आणि येथे प्रत्येक वर्षी जवळपास ५२ हजार जणांची हत्या होत असते. त्यातच रियो येथेच प्रत्येक दिवसाची सरासरी तीनपेक्षा अधिक हत्येची असते.तथापि, ब्राझीलने गेल्या काही वर्षांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यात २0१२मध्ये यूएन रियो पर्यावरण संमेलनाचा समावेश आहे. त्यात १९१ देशांनी सहभाग घेतला होता.रियोचे सुरक्षाप्रमुख आंद्रेई पासोस रॉड्रिगेज म्हणाले, 'कोणत्याही अन्य देशांनी इतक्या कमी वेळेत इतक्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले नाही आणि त्याचा आम्हाला मोठा अनुभव मिळाला आहे, त्याचा उपयोग आम्ही ऑलिम्पिकदरम्यान करू शकतो.'सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकारी अनेक बाबींवर लक्ष देत आहेत. रियोत गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे; परंतु त्यानंतरही अजूनही काही गुन्हे होत आहेत. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांतच दररोज सरासरीने ३ ते ४ हत्या होत आहेत. रियोतील स्थानिक स्तरावर होणारी हिंसा प्रकाशझोतात येते आणि त्यामुळे तेथे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक केंद्राच्या पूर्ण परिसरात रात्री बाहेर निघणे हे धोकादायक मानले जाते. अधिकांश निवासी हे सध्याच्या वातावरणात ऑलिम्पिकच्या सेलिंग स्पर्धेसाठी टॅक्सीशिवाय मरिना येथे जाण्यास नकार देतील. कारण त्याजवळील पार्क हे लुटमारीसाठी बदनाम आहे. याशिवाय ऑलिम्पिककडे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता म्हणूनही पाहिले जात आहे.ऑलिम्पिक इतिहासात अजूनही १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये दहशतवाद्यांद्वारे इस्रायली खेळाडूच्या हत्येची छाया आहे; परंतु आजचे संभाव्य धोके वाढले आहेत, त्यात ड्रोनच्या धोक्याचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)=================================