मोदी यांच्या १०० दौ-यांचा खर्च केला तरी कोणी? काँग्रेसने केला भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:05 AM2017-10-19T04:05:45+5:302017-10-19T04:06:17+5:30

गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००३ ते २००७ या काळात मोदी यांनी केलेल्या देश-विदेशातील दौ-याचा खर्च कोणी केला, असा सवाल करत काँगे्रसने भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

 Even though Modi spent 100 visits? The Congress has made the BJP question | मोदी यांच्या १०० दौ-यांचा खर्च केला तरी कोणी? काँग्रेसने केला भाजपाला सवाल

मोदी यांच्या १०० दौ-यांचा खर्च केला तरी कोणी? काँग्रेसने केला भाजपाला सवाल

googlenewsNext

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००३ ते २००७ या काळात मोदी यांनी केलेल्या देश-विदेशातील दौ-याचा खर्च कोणी केला, असा सवाल करत काँगे्रसने भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्याला दुस-या दिवशी काँग्रेसने कागदोपत्री पुरावे सादर करून संघर्षाची तयारी केली.
मोदी पाच वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देश व विदेशात १०० पेक्षा जास्त दौरे केले व हे दौरे खासगी विमानांतून होते. त्यांच्यावर १६.५६ कोटी रुपयांचा खर्च झाला. हा खर्च कोणी केला याचे उत्तर भाजप व मोदी यांनी द्यावे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

खासगी विमान वापरले

मोदी यांनी सिंगापूर, बीजिंग (चीन), हाँगकाँग, स्वीत्झर्लंड आदी देशांचे दौरे केले. बहुतेक दौरे हे खासगी विमानांनी झाले असून ती विमाने अदानी, रिलायन्स, पुनावाला, एस्सार, रेमंड कंपन्यांची होती.

Web Title:  Even though Modi spent 100 visits? The Congress has made the BJP question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.