आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:25+5:302015-01-31T00:34:25+5:30

आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

Even today, Gandhiji's thoughts are relevant | आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

आजच्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

Next
च्या काळातही गांधीजींचे विचारच प्रासंगिक

जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती : महात्मा गांधीजींचा आदरांजली

नागपूर :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती आणि नगर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नागपुरात अहिंसा दिन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.
सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आजच्या काळातच नव्हे तर भविष्यातही केवळ आणि केवळ गांधीजींचे विचारच प्रासंगिक राहतील. जगात आजवर यशस्वी झालेली आंदोलने ही केवळ गांधीजींच्या मार्गानेच यशस्वी झाल्याचे प्रतिपादित करतांना दहशतवादामुळे कुठलेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, या शब्दांमध्ये मुत्तेमवारांनी आपली शब्दपुष्पांजली अर्पण केली. माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व डॉ. सतीश चतुर्वेदी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार अशोक धवड, अविनाश वारजूरकर, यादवराव देवगडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शहर महिला काँगेसच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक व्यासपीठावर होते.
कार्यक्रमाची सुरुवात सचिन आणि सुरभी ढोमणे द्वारा संचालित सुरसंगम संस्थेने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी झाली. या गीतांच्या सादरीकरणाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले तर सोहळ्याचे संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले.
कार्यक्रमाला माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, स्वातंत्र्य सेनानी पुंडलिकराव जौंजाळ, अ.भा. सेवादल संघटक कृष्णकुमार पांडे, राजू व्यास, तानाजी वनवे, डॉ. राजू देवघरे, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. अनिल शर्मा, विनोद सोनकर, शहर सेवादल संघटक रामगोविंद खोब्रागडे, डॉ. सूर्यकांत भगत, नगरसेवक प्रशांत धवड, देवा उसरे, अरुण डवरे, योगेश तिवारी, अमान उल्लाह खान, दीपक कापसे, प्रसन्ना बोरकर,नगरसेविका हर्षला साबळे, शीला मोहोड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बॉक्स..
गोडसेचा निषेध करणाऱ्या पत्रकांचे वाटप

कार्यक्रमादरम्यान बहुजन संघर्ष समितीचे नागेश चौधरी, बबन नाखले, प्रा. अरविंद देशमुख, प्रमोद मून, गिरीश वडदकर, जगन वंजारी यांनी महात्माजींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेचा निषेध करणारी पत्रके वाटलीत.

Web Title: Even today, Gandhiji's thoughts are relevant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.