आजही देशात आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही - शरद यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:30 AM2017-08-27T05:30:04+5:302017-08-27T05:30:04+5:30
विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.
- हरिश गुप्ता ।
नवी दिल्ली : विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले. राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, त्या काळात व आता खूप फरक आहे. आज आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही. अंधारमय वातावरण भयंकर आहे. येथील विविधता, संस्कृती धोक्यात आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, त्या वेळी संस्कृती धोक्यात नव्हती. तो धोका राजकीय होता.
नितीशकुमार यांनी बिहारचेच नव्हे, तर देशाचे नुकसान केले आहे, असे मत व्यक्त करीत, यादव यांनी आपलेच संयुक्त जनता दल खरे आहे, असा दावा केला. राहुल गांधी सच्चे असून, देशाच्या भल्ल्यासाठी प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.
यादव म्हणाले की, बिहारमध्ये महाआघाडी झाली, तेव्हा भाजपाने महाराष्ट्र-हरयाणात यश मिळविले होते, पण बिहारमधील जनतेने त्यांना रोखले. तो एनडीएचा पहिला पराभव होता. एवढा विश्वास आम्हाला लोकांनी दिला होता. या विश्वासाला नितीश कुमारांमुळे तडा गेला.