आजही पाणी पुरवठा अनिश्चित व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ : नागरिकांचे अतोनात हाल
By admin | Published: March 11, 2016 12:27 AM2016-03-11T00:27:43+5:302016-03-11T00:27:43+5:30
जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनता बेहाल झाली आहे.
Next
ज गाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनता बेहाल झाली आहे. वाघूर पाणी पुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर मेहरूणमधील रेणुका हॉस्पिटलनजीक लागलेल्या गळतीचे काम पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी दुपारी ३ वाजता सुरू केले. बुधवारी रात्री ८ वाजता पूर्ण झाले. व्हॉल्व्हने दिला दगापाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम तब्बल ३० तासांच्या परिश्रमानंतर आटोपले. यानंतर गिरणा टाकी भरण्यासाठी एमआयडीसी रोडवरील हॉटेल कस्तुरीनजीक असलेला मुख्य वाहिनीवरील हॉल्व्ह उघडण्यासाठी कर्मचारी गेले असता तो जाम झाल्याचे लक्षात आले. बरेच प्रयत्न करूनही तो उघडणे शक्य झाले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यासाठी प्रयत्न झाले मात्र तरीही व्हॉल्व्ह उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे शहरात सलग चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. -----इन्फोजनता बेहालऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र शहरातील उपनगरांमध्ये होते. शहरालगत असलेल्या तांबापूरा, हरिविठ्ठल नगर, समता नगर यासह झोपडपी भागातील नागरिकांना तर याचा अधिकच त्रास होत आहे. -----व्हॉल्व्ह उघडण्यासाठी क्रेनची मदतबरेच प्रयत्न करूनही हा व्हॉल्व्ह उघडला न गेल्याने अखेर त्याच्या आजुबाजुने जेसीबी लावून खड्डा खोदण्यात आला. यानंतर क्रेन आणून सकाळपासून व्हॉल्व्ह उघडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. व्हॉल्व्हची झडप उघडत नसल्याने बाहेरून काही तज्ज्ञांना बोलवून हे काम करण्यात येत होते मात्र उशिरापर्यंत त्यात यश न आल्याने रात्री व्हॉल्व्ह पूर्ण काढण्यात आला. तेथे पाईप जोडण्यात येणार असून त्यानंतर पाणी पुरवठा केला जाणार आहे. हे कामही रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने शुक्रवारचा पाणी पुरवठाही अनिित असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी सांगितले.