तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:51 PM2020-08-25T15:51:06+5:302020-08-25T15:51:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने काम दाखवून दिलं
नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि पूर्वीश्रमीचे भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी काश्मिरी जनतेच्या पाठिशी असल्याचं सांगत आर्टीकल 370 पुन्हा लागू करण्याची आवशक्यता असल्याचं म्हटलंय. सर्वच राज्यांना त्यांचे अधिकार वापरता आले पाहिजे, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा यांच्या या ट्विटनंतर भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करुन सिन्हा यांच्यावर आगपाखड केली. तुमचा बापसुद्धा आता 370 पुन्हा लागू करू शकणार नाही, असे ट्वि मिश्रा यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने काम दाखवून दिलं. मोदींच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक झाले, तर काहींनी टीकाही केली. पहिल्या पाच वर्षात मोदींनी नोटबंदी, जीएसटी आणि सर्जिकल स्ट्राईकसारखे धाडसी निर्णय घेऊन दुसऱ्यांदा सत्ता काबिज केली. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनाही मोदींच्या कार्याची, नेतृत्वाची भुरळ पडली आहे. आर्टीकल 370 हटवणे आणि नागरिकत्व संसोधन कायदा हे दोन धाडसी निर्णय मोदी सरकार2 ने घेतले आहेत.
मोदी सरकारच्या या दोन्ही निर्णयाविरुद्ध काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचं संकट असल्याने कोरोना आटोक्यात आणणे आणि देश पूर्ववत चालवणे हेच ध्येय सरकारचे आहे. त्यामुळे, इतर मुद्दे जास्त चर्चिले जात नाहीत. मात्र, यशवंत सिन्हा यांनी जम्मू व काश्मीरमधील नेत्यांच्या संकल्पनेचे स्वागत करत, आर्टीक 370 व कलम 35 अ पुन्हा लागू करण्याच गरज असल्याचे म्हटले.
तुम्हारा बाप भी नहीं करवा सकता 370 वापस https://t.co/IGUn9o22oS
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) August 25, 2020
'काश्मीरमध्ये पूर्वस्थिती प्रस्थापित करण्याच्या काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या संकल्पनेचे मी स्वागत करतो. जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र राज्य असावे, येथील हटविण्यात आलेले कलम 370 आणि आर्टीक 35 A पुन्हा लागू करणे आवश्यक आहे. कारण, सर्वच राज्यांना अधिकाधिक अधिकारांचा वापर करता आला पाहिजे, असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे. सिन्हा यांच्या या ट्विटला भाजपा नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुमचा बापसुद्ध 370 पुन्हा लागू करु शकणार नाह, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. तर, सिन्हा यांच्या ट्विटवनंतर कमेंट करुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय.