महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांसाठी दररोज हवाई सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 03:58 AM2018-01-27T03:58:58+5:302018-01-27T03:59:01+5:30
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.
या योजनेसाठी सहा एअरलाईन्सनी सेवा देण्याचे आश्वासन नागरी उड्डयन मंत्रालयाला दिले आहे. नाशिकच्या ओझरहून दिल्लीसाठी आठवड्यात केवळ तीनच दिवस ‘उडान’चा लाभ मिळेल. या मार्गावर जेट एअरवेजने उडान सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील चार शहरांत सुरू होणाºया उडान सेवेत सर्वाधिक भाडे याच मार्गावर असेल. ओझर-नाशिक व दिल्ली दरम्यानच्या विमानात १६८ सीट असतील.
यातील ४० सीट उडानसाठी आरक्षित असतील व त्यांचे भाडे ३,४६० रुपये असेल. एका अधिका-याने सांगितले की, उडान सेवेच्या अंतर्गत प्रत्येक मार्गावर सीट आरक्षित केलेले आहेत. त्याशिवायच्या सीटसाठी एअरलाईन्स प्रचलित बाजारभावानुसार तिकीट विकणार आहे.
या टप्प्यात सर्व शहरांत सहा महिन्यांमध्ये उडान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सरकार यासाठी सुमारे ६२० कोटी रुपये खर्च करणार आहे. यातून उडान-२च्या सर्व विमानतळांवरील मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील.
उडानच्या दुसºया टप्प्यात महाराष्टÑातील जळगाव, कोल्हापूर, ओझर-नाशिक व सोलापूरमधून उड्डाणे सुरू होतील. यात जळगावमधून केवळ अहमदाबादच्या दररोजच्या हवाई सेवेसाठी केवळ ट्रूजेटने तयारी दर्शवली. या मार्गावर ७२ सीट असतील व यातील ३६ उडान सेवेसाठी असतील. याचे भाडे २,२३० रुपये असेल. याशिवायच्या सर्व सीटचे भाडे एअरलाईन्स कंपनी बाजारभावानुसार विक्री करू शकणार आहे.