प्रत्येक भारतीयाने सहिष्णुता जपावी, देशाचे भविष्य तरुणांच्या हाती - राष्ट्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:49 AM2018-01-26T03:49:18+5:302018-01-26T03:49:32+5:30
एखाद्याची भूमिका मान्य नसली तरी त्याबाबत प्रत्येक भारतीयाने सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे. खºया लोकशाहीचे तेच लक्षण असून, राज्यघटनाकारांची तीच अपेक्षा होती, असे सांगतानाच, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी केले.
नवी दिल्ली : एखाद्याची भूमिका मान्य नसली तरी त्याबाबत प्रत्येक भारतीयाने सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे. खºया लोकशाहीचे तेच लक्षण असून, राज्यघटनाकारांची तीच अपेक्षा होती, असे सांगतानाच, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी परस्परांचा आदर, सहिष्णुता, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि उत्तम आरोग्य या मुद्द्यांवर विशेष भर दिला.
राष्ट्रपतींनी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन असल्याचा उल्लेख करून, प्रत्येकाने मतदान करावे आणि इतरांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन केले. राज्यघटना व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करायलाच हवा, असे ते म्हणाले.
देशाचे भविष्य तरुणांच्या हाती-
आज भारतातील ६0 टक्क्यांहून अधिक नागरिक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य त्यांच्यात हाती आहे. देशाच्या साक्षरतेत मोठी वाढ झाली आहे. त्यापुढील टप्पा आहे शिक्षणाला आणखी चालना द्यायचा, असे ते म्हणाले.