दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:21 AM2018-05-09T05:21:18+5:302018-05-09T05:21:18+5:30

शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजेच आनंदवार साजरा करतील.

Every Saturday, students get relief from the School bag's burden, Delhi government schools order | दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश

दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश

- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली - शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजेच आनंदवार साजरा करतील. त्या दिवशी वर्गांत फक्त चार तासांचे शिकवणे होईल. या दिवशी मुलांना दप्तराचे ओझे वाहून न्यावे लागणार नाही. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तमिळनाडू मॉडल समोर ठेवून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनोखी उपाययोजना केली आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीने सांगितले की, दप्तराचे ओझे कमी करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. कोठारी आयोगापासून ते प्रोफेसर यशपाल समितीने दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. आधीच्या सरकारांनीही याबाबत चर्चांचे आयोजन केले होते. परंतु, याबाबतीत तमिलनाडू राज्याने देशात सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. तेथे विद्यार्थ्याला त्याच्या दप्तरात पाच ते सात किंवा दहा वह्या-पुस्तके नव्हे तर एक पुस्तक व एक वही घेऊन शाळेत जावे लागते. हे पुस्तक आणि वही सगळ््या विषयांना एकत्र करून एक महिन्यासाठी बनवली गेलेली असते. अभ्यासक्रम वार्षिक असला तरी महिन्याच्या हिशेबाने ८ ते ९ पुस्तके तयार केली जातात. एका पुस्तकात सगळ््या विषयांचे धडे असतात. हे पुस्तक ८०० नव्हे तर २०० पानांचे असते. वर्गात लॉकर बनवायची गरज नाही की दप्तराचे ओझे वाहून न्यायची.

नृत्य, चित्रकला,
रायडिंग शिकवा
केंद्रीय विद्यालय संघटनचे अतिरिक्त आयुक्त (अकादमिक) यू. एन. खावरे म्हणाले की, नव्या शैक्षणिक सत्रात शाळांना त्यांनी शनिवारी प्राथमिक वर्गांना दप्तरातून सूट देण्यास सांगितले आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, नाटक, अभिनव लेखन, चित्रकला आदी उपक्रमांत शिक्षकांनी गुंतवावे. याशिवाय शाळांमध्ये इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेले क्लब्जनी (रायडिंग, एन्व्हायरमेंट इत्यादी) विद्यार्थ्यांत कौशल्य विकासासाठी त्यांना बागकाम, कविता लेखन, चित्रपट बनवणे, रेडिओ कार्यक्रम आदी उपक्रमांत गोडी निर्माण करावी.

वजनाचा आरोग्यावर विपरित परिणाम
राजस्थानस्थित जालोरचे शिक्षक संदीप जोशी यांनी शाळकरी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बरेच काम केले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार राजस्थानात अनेक शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काम सुरू केले आहे. जोशी यांनी अभ्यासातून दाखवून दिले की, लहान मुलांच्या नाजूक शरीरावर या ओझ्याचा विपरीत परिणाम होत असतो. मणक्याच्या हाडावर जास्त ओझे पडल्यामुळे विद्यार्थ्याचा अपेक्षित व योग्य विकास होत नाही.
 

Web Title: Every Saturday, students get relief from the School bag's burden, Delhi government schools order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.