काय सांगता? अख्खं गाव कोरोना पॉझिटिव्ह; पण फक्त एक व्यक्ती निगेटिव्ह, "हे" आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 10:58 AM2020-11-23T10:58:40+5:302020-11-23T11:05:52+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: एक व्यक्ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 91,39,866 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,059 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 511 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,33,738 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक घटना समोर येत आहेत. एक व्यक्ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घटना समोर आली आहे.
मनालीच्या लाहौल खोऱ्यातील थोरांग गावातील केवळ एक गावकरी वगळता इतर सर्वांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लाहौलमधील या बातमीने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. भूषण ठाकूर असं या एका गावकऱ्याचं नाव असून फक्त त्यांच्याच कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. 52 वर्षीय भूषण हे गावातली एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. भूषण यांच्या कुटुंबातील सर्व सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! "देशातील 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका"https://t.co/QxvWPGOn0J#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) November 22, 2020
संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह असताना फक्त भूषण यांचा रिपोर्ट निगेटिव्ह
भूषण ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते आयसोलेशनमध्ये राहत आहेत. तसेच ते स्वत:चं जेवण स्वत: करतात." सोशल डिस्टन्सिंग पालन योग्य रित्या केलं तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो हे भूषण यांच्या उदाहरणाने सिद्ध झालं आहे. लाहौल-स्पितीचे सीएमओ डॉ. पलजोर यांनी कदाचित भूषणची प्रतिकारशक्ती खूप मजबूत आहे. संपूर्ण गावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना फक्त भूषण यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मुख्यमंत्रीही चकित झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना लसीसंदर्भात WHO प्रमुखांनी केलं मोठं विधानhttps://t.co/OmXoxiHCpR#coronavirus#CoronaVirusUpdates#coronavaccine#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) November 17, 2020
लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरांग गावात फक्त 42 गावकरी आहेत. यातील जवळपास सर्वच जण हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलू येथे स्थलांतरीत झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी आपली कोविड चाचणी करुन घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात 42 पैकी एकूण 41 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गावातील सर्व गावकरी काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते. या कार्यक्रमामुळेच कोरोचा फैलाव झाल्याचं सांगण्यात येत आहे.
थोरांगा गावाच्या आसपासच्या परिसरातील आणखी काही जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. लाहौलमध्ये सर्व नागरिकांना स्वत:हून पुढाकार घेऊन कोविड चाचणी करुन घेण्यासाठीचं आवाहन आमच्या टीमकडून करण्यात आलं आहे, असं लाहौलचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पलजोर यांनी सांगितलं. जिल्ह्यात आतापर्यंत 856 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असंही ते पुढे म्हणाले.
CoronaVirus News : कोरोनावर प्रभावी लस विकसित केल्याचा चीनचा दावा, आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास दिली मंजुरी https://t.co/5I2Ih5baRq#coronavirus#coronavaccin#ChinaVirus#China
— Lokmat (@MiLOKMAT) November 22, 2020