दिवसभर एकमेकींना मारत असतात

By Admin | Published: August 13, 2015 10:34 PM2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30

या जुळ्या बहिणींचे एक वैशिष्ट्य म्हणजे दोघी दिवसभर एकमेकींना मारत असतात. सायकल कोणी चालवायची यावरून तर दोघींचे सारखे भांडण सुरू असते. एक सायकल चालवायला लागली की दुसरी लगेच मागून ती ओढायला लागते. यांच्या माराच्या तावडीतून यांचा लहान भाऊही सुटलेला नाही.

Everyone hits each other throughout the day | दिवसभर एकमेकींना मारत असतात

दिवसभर एकमेकींना मारत असतात

googlenewsNext
जुळ्या बहिणींचे एक वैशिष्ट्य म्हणजे दोघी दिवसभर एकमेकींना मारत असतात. सायकल कोणी चालवायची यावरून तर दोघींचे सारखे भांडण सुरू असते. एक सायकल चालवायला लागली की दुसरी लगेच मागून ती ओढायला लागते. यांच्या माराच्या तावडीतून यांचा लहान भाऊही सुटलेला नाही.
मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे इंदिरानगरमध्ये राहणारे व मजुरी करणारे विश्वनाथ अर्जुन तरंगे व लक्ष्मीबाई तरंगे यांच्या अंजू व मंजू या जुळ्या कन्या. यांच्या घरातील हे पहिलेच जुळे.
२ मे २००५ ही अंजू व मंजू यांची जन्मतारीख. स्व. दाजीकाका गोडबोले विद्यालयात दोघी पाचव्या इयत्तेत शिकतात. दोघीही दिसायला सारख्याच. केसांची ठेवण, यांची उंची आणि शाळेचा ड्रेसही सारखाच. त्यामुळे शाळेत यांना ओळखण्यात सर्वांचीच फसगत होते. यांच्यातील नेमके कोण हे शेजारी बसणारे विद्यार्थी शिक्षकांना सांगतात. अंजूच्या भुवयावरचा तीळ हीच यांची ओळख. दीपाली ही यांची मोठी बहीण सातवीमध्ये तर राकेश हा छोटा भाऊ दुसरीमध्ये आहे.
४संजय द. शिंदे


चार महिन्यांनंतर भेटले तिळे
इंग्लंडमधील सामंथा या महिलेने १४ आठवडे आधीच तिळ्यांना जन्म दिला. हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता असल्याने तिघांना तीन वेगवेगळ्या इस्पितळात इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. चार महिन्यांनंतर हे तिळे एकमेकांना भेटले.

Web Title: Everyone hits each other throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.