"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 02:29 PM2021-12-19T14:29:41+5:302021-12-19T14:33:09+5:30

"40,000 वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा DNA हा आजच्या लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत, त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला आणि आपली संस्कृती टिकून राहिली."

"Everyone living in India for 40,000 years has the same DNA" - Mohan Bhagwat | "40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

googlenewsNext

धर्मशाळा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा भारतीयंच्या DNAवर भाष्य केले आहे. मागील "40,000 वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा डीएनए आजच्या काळातील लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला, आपली संस्कृती टिकून राहिली,"असे वक्तव्य भागवत यांनी केले आहे. भागवत पाच दिवसांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. 

संघाला सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून दाखवले जाते
ते पुढे म्हणाले की, ''अनेकदा माध्यमांमध्ये संघाला सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून दाखवले जाते. पण, हे अजिबात खरे नाही. माध्यमे आम्हाला सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून संबोधतात, परंतु हे असत्य आहे. मात्र, आमचे काही कार्यकर्ते नक्कीच सरकारचा भाग आहेत. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतेही आश्वासन देत नाही'', असं ते म्हणाले.

भारत विश्वगुरू होऊ शकतो
वैद्यकशास्त्रातील प्राचीन भारतीय पद्धतींवर बोलताना ते म्हणाले की, “भारताला आधीपासून कधा, क्वाथा आणि आरोग्यशास्त्र यांसारख्या पारंपारिक उपायांमधून पाहिले गेले आहे. आता जग भारताकडे पाहत आहे आणि भारतीय मॉडेलचे अनुकरण करू इच्छित आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनू शकत नाही, पण तो विश्वगुरू नक्कीच होऊ शकतो. महामारीनंतरच्या काळात जागतिक नेता बनण्याची क्षमता भारतात नक्कीच आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: "Everyone living in India for 40,000 years has the same DNA" - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.