''काश्मीरमध्ये सगळंच सुरळीत आहे, मग 9 लाख जवान तैनात कशासाठी?''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:59 PM2019-10-10T17:59:07+5:302019-10-10T18:03:09+5:30
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकानंतर एक ट्विट करून मेहबुबा मुफ्तींनी भाजपावर टीका केली आहे. जर काश्मीरमध्ये सर्वच परिस्थिती सामान्य आहे, मग मोदी सरकारनं 9 लाख जवान कशासाठी तैनात केले आहेत.
पुढे मेहबुबा मुफ्तींनी सांगितलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी जवान तैनात केलेले नाहीत, विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांना रोखण्याचं काम हे जवान करत आहेत.
लष्कराची प्राथमिक जबाबदारी ही नियंत्रण रेषेची सुरक्षा करण्याची आहे. आंदोलकांना चिरडण्याचं काम सेनेनं केलेलं नाही. पीडीपी प्रमुखांनाही या दिवसांमध्ये नजरकैद करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी इल्तिजा ट्विटर अकाऊंटवर सक्रिय आहे. भाजपा मतं मिळवण्यासाठी जवानांचा उपयोग करतंय. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी जवानांचा वार केला जात आहे. सत्ताधाऱ्यांना जवान आणि काश्मिरींची चिंता नाही. त्यांची एकमात्र चिंता निवडणूक जिंकणं ही आहे. तसेच मेहबुबा मुफ्तींनी तीन काश्मिरी नेत्यांना केलेल्या नजरकैदेवरूनही सरकारला धारेवर धरलं आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांनी याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर काश्मीर दौऱ्यावरून निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर अजित डोवाल काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित डोवाल यांना लक्ष्य केले होते. गेल्या दौऱ्यावेळी फोटो सेशनदरम्यान लंचमध्ये बिर्याणी होती. यावेळी हलीम आहे का? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला होता. आरेमधील वृक्षतोड थांबवण्यात पर्यावरणप्रेमींना यश आल्याबद्दल आनंद आहे.Ms Mehbooba Mufti, former Chief Minister J&K to whom this twitter handle belongs has been detained since 5th August 2019 without access to the account. This handle is now operated by myself, Iltija daughter of Ms Mufti with due authorisation.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) September 20, 2019
मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकारही काश्मिरी लोकांना का नाकारले जात आहेत हे समजत नाही. सध्या काश्मिरींना इतर भारतीयांप्रमाणे हक्क दिले जात असल्याचे सरकार सांगत आहे, पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. येथील काश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकारही काढून घेण्यात आले आहेत,' असं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी वृक्षतोडीचा निषेध नोंदविला होता. तसेच मेहबुबा मुफ्ती यांनीही आंदोलकांचे समर्थन करताना वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले होते.A democratic India that always fought for principles of liberty & equality is today being questioned & castigated for its brutal actions in Kashmir internationally. Governments will come & go but what about the damage done to the reputation & moral fabric of this country?
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 10, 2019