दिल्ली महापालिकेसाठी ईव्हीएमचाच वापर होणार
By admin | Published: March 15, 2017 12:44 AM2017-03-15T00:44:04+5:302017-03-15T00:44:04+5:30
दिल्ली महापालिकेच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) ऐवजी मतपत्रिकेद्वारा आयोजित करा. त्यासाठीची आवश्यक औपचारिकता मंगळवार
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
दिल्ली महापालिकेच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) ऐवजी मतपत्रिकेद्वारा आयोजित करा. त्यासाठीची आवश्यक औपचारिकता मंगळवार सायंकाळपर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, हे शक्य नसल्याचे दिल्ली निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
दिल्ली महापालिका निवडणूक २२ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २५ एप्रिलला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे केजरीवालांनी ठरवले होते. मात्र, वेळेअभावी ते शक्य नसल्याचे दिल्ली निवडणूक आयुक्त एस.के. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाची लाट आल्याने ईव्हीएमवर शंका घेण्यात आली होती.