ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

By admin | Published: April 6, 2017 04:29 AM2017-04-06T04:29:21+5:302017-04-06T04:29:21+5:30

भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला

Ewm won the election by rigging | ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

Next

सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला. सरकारविरोधी घोषणा देत विरोधक आसनासमोर आल्याने उपसभापतींना कामकाज तहकूब करावे लागले.
काँग्रेसचे दिग्विजयसिंग व प्रमोद तिवारी तसेच सपाचे रामगोपाल यादव व नरेश अग्रवाल यांनी ईव्हीएम मशिनच्या कथित छेडछाडीवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या होत्या. उपसभापतींनी त्या फेटाळल्या, मात्र सदस्यांना थोडक्यात बोलण्याची अनुमती दिली. ईव्हीएममध्ये कोणताही बदल करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाद मागावी, असे नमूद करीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे तमाम आरोप फेटाळले.
मायावती म्हणाल्या की, सुरुवातीची १00 ते १५0 मते नोंदवल्यानंतर मतदाराने कोणालाही मत दिले तर ते भाजपलाच मिळेल, असे बदल ईव्हीएममध्ये करण्यात आले. हा आरोप ऐकताच सत्ताधारी सदस्य संतापून उठले. यावेळी मायावतींची काही विधाने कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले.
संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता आलेला नाही. हताशेपोटी ते वाटेल ते आरोप करीत आहेत. याच यंत्रांद्वारे २00४ व २00९ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अलीकडेच बिहार, दिल्ली, पंजाब मणिपूर, गोवा आदी राज्यातही निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमच वापरण्यात आली.
गुलाम नबी आझाद म्हणाले, निवडणुका पाच राज्यांत झाल्या. मात्र चर्चा उत्तर प्रदेशबाबत होते आहे याचे कारण काय हे समजावून घेतले पाहिजे. तिथे मतांची चोरी अत्यंत सफाईदारपणे करण्यात आली. दिग्विजयसिंग यांनी मध्य
प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या ईव्हीएम यंत्रांची तपासणी करताना मतदान कोणालाही केले तर भाजपच्या उमेदवारालाच ते मिळेल अशी व्यवस्था केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला.
>मतपत्रिकाच हव्यात
गुलाम नबी आझाद म्हणाले, वर्षअखेरीला गुजराथ आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे.
मध्यप्रदेशात काही पोटनिवडणुका आहेत. ईव्हीएम मशिन्स ऐवजी त्याठिकाणी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे.

Web Title: Ewm won the election by rigging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.