“आता या गद्दाराशी संपूर्ण गाव कोणतंही नातं ठेवणार नाही”; हेरगिरीच्या आरोपानं गावकरी संतप्त

By प्रविण मरगळे | Published: January 10, 2021 10:21 AM2021-01-10T10:21:11+5:302021-01-10T10:25:20+5:30

सौरभने देशाची गद्दारी करत संपूर्ण गावाचं नाव शरमेने खाली आणलं

Ex Army Man Saurabh Sharma Of Hapur Held For Sharing Army Info To Pakistan | “आता या गद्दाराशी संपूर्ण गाव कोणतंही नातं ठेवणार नाही”; हेरगिरीच्या आरोपानं गावकरी संतप्त

“आता या गद्दाराशी संपूर्ण गाव कोणतंही नातं ठेवणार नाही”; हेरगिरीच्या आरोपानं गावकरी संतप्त

Next
ठळक मुद्देसौरभचे आजोबा यूपी पोलिसात होते, २०१३ मध्ये सौरभ लष्करात भरती झालाकिडनीच्या आजारामुळे गेल्या ७ वर्षापूर्वी सौरभ घरी परतला आहे.सौरभ पाकिस्तान आणि अन्य देशांना महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती देत होता

हापूड – माजी सैनिक सौरभ शर्माच्या अटकेनंतर बिहूनी गावातील लोकांची मान शरमेने खाली गेली आहे. एटीएस लखनौच्या टीमने लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपाखाली शुक्रवारी शर्माला अटक केली आहे. मिलिट्री इंटेलिजेंसच्या सूचनेआधारे ही कारवाई करण्यात आली. याबाबत गावातील निवृत्त मेजर भीष्म त्यागी यांनी घटनेवर नाराजी व्यक्त केली.

भीष्म त्यागी म्हणाले की, सौरभने देशाची गद्दारी करत संपूर्ण गावाचं नाव शरमेने खाली आणलं. गद्दाराशी गावातील कोणताही व्यक्ती नातं ठेवणार नाही असं त्यांनी सांगितले. तर मुलावर लावलेल्या आरोपावर मधु शर्मा यांना विश्वास बसत नाही, मधु याचे म्हणणं आहे की, आमचं कुटुंब पहिल्यापासून देशसेवेत आहे. सौरभचे आजोबा यूपी पोलिसात होते, २०१३ मध्ये सौरभ लष्करात भरती झाला. किडनीच्या आजारामुळे गेल्या ७ वर्षापूर्वी सौरभ घरी परतला आहे. सौरभने फेसबुकवर एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात येत अनेक महत्त्वाच्या माहिती दिली आहे. एका डिफेन्स जर्नलिस्टला महिलेने हे सांगितले असा एटीएसचा आरोप आहे.

तर सूत्रांच्या माहितीनुसार, नोकरी सोडल्यानंतर लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी सौरभच्या बँक खात्याची चौकशी केली असता त्यात अनेक संशयास्पद व्यवहार सापडले. त्यानंतर सौरभवर नजर ठेवण्यात आली. १५ दिवसापूर्वी डिसेंबरमध्ये सौरभला एटीएसने अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी मेरठ एटीएसच्या टीमने सौरभच्या हापूड येथील गावात आली आणि पुन्हा त्याला अटक केली. त्याच्याकडून महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली.

ATS च्या माहितीनुसार, सौरभ पाकिस्तान आणि अन्य देशांना महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती देत होता. सौरभच्याविरोधात लखनौच्या एटीएस ठाण्यात गुप्त ऑफिशियल सीक्रेट एक्टप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी सौरभला एटीएसने पकडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

Web Title: Ex Army Man Saurabh Sharma Of Hapur Held For Sharing Army Info To Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.