जीन्स घालणा-या मुलींच्या कुटुंबियांवर बहिष्कार घाला- उ.प्रदेश पंचायतीचे आदेश
By admin | Published: April 11, 2016 02:44 PM2016-04-11T14:44:00+5:302016-04-11T18:21:37+5:30
ज्या मुली जीन्स तसेच घट्ट कपडे घालतील त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्यात यावा असा निर्णय उत्तर प्रदेशमधील बावली गावातील पंचायतीने दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
भागपत (उत्तर प्रदेश), दि. ११ - ज्या मुली जीन्स तसेच घट्ट कपडे घालतील त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्यात यावा असा निर्णय उत्तर प्रदेशमधील बावली गावातील पंचायतीने घेतला आहे. तसेच एखाद्याच्या लग्नसमारंभादरम्यान डीजे वा गाणी लावण्यात येणार नाही, अशी शपथही पंचायतीतर्फे गावक-यांना देण्यात आली.
' उत्तर प्रदेशच्या बावली गावात भरवण्यात आलेल्या पंचायती दरम्यान हे निर्णय घेण्यात आले. गावातील मुलींनी जीन्स तसेच इतर घट्ट कपडे घालू नयेत. जर एखाद्या मुलीने तसे कपडे घातले तर ती मुलगी व तिच्या कुटुंबियांवप बहिष्कार टाकण्यात येईल' अशी माहिती गावच्या सरपंचाचे पती ओमवीर यांनी दिली.
पंचायतीचे हे काही निर्णय अतिरेकी वाटत असले तरी त्यांनी काही चांगले निर्णयही घेतले आहेत. आपल्या मुलांच्या लग्नात कोणीही हुंडा देणार वा घेणार नाही. तसेच स्त्री-भ्रूणहत्येविरोधातही पंचायतीने आवाज उठवला आहे. आणि या नियमांचे पालन करणा-यांवरही बहिष्कार घालण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर 'कोणीही एखाद्या व्यक्तीच्या १३ व्याला जाऊ नये तसेच तिथे जेवणही घेऊ नये' असा आदेशही पंचायतीतर्फे देण्यात आला आहे.